किरकोळ वादावरून कोयत्याने वार, तरुण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:10 IST2021-02-05T05:10:38+5:302021-02-05T05:10:38+5:30
याप्रकरणी आकाश मधुकर भंडारी ( वय २१, रा. थेऊर, ता. हवेली ) याने दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय धनंजय सोनवणे, बाबू ...

किरकोळ वादावरून कोयत्याने वार, तरुण गंभीर जखमी
याप्रकरणी आकाश मधुकर भंडारी ( वय २१, रा. थेऊर, ता. हवेली ) याने दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय धनंजय सोनवणे, बाबू (पूर्ण नाव माहीत नाही) डोळ्याने चकणा व मंदार सकट याचा भाऊ ( नाव माहीत नाही ) यांचेविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळच्या नात्यातील मुलीच्या प्रेमप्रकरणातून बंटी रणदिवे याला आकाश याने समज दिली होती तेव्हा पासून बंटी व त्याचे मित्र सोनवणे व इतरांशी किरकोळ वाद होत होते. तसेच आकाशचा मित्र अरविंद कांबळे याचे अक्षय सोनवणे व त्याच्या मित्रांसोबत वाद असल्याने अक्षय सोनवणे,बाबू सकट यांनी आकाशला अरविंद कांबळे सोबत राहू नकोस, नाही तर तुला पश्चाताप होईल अशी धमकी दिली होती.
मंगळवार ( २६ जानेवारी ) रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आकाश शुभम मोबईल शॉपीवर असताना तेथे वरील चार जण आले. अक्षय सोनवणे व बाबू दुकानात येऊन त्यातील सोनवणे हा आकाशला तू मला का शिव्या दिल्या बाहेर ये असे म्हणाला. आकाश दुकानाच्या बाहेर पाय-यांवर आल्यावर सोनवणे हा बाबू व सकट यांना म्हणाला की, याला सांगूनही हा अरविंद कांबळेसोबत फिरतो, आपल्याला नडतो याला आज जिवंत सोडायचे नाही, असे म्हणाला. त्यानंतर तिघांनी त्यांच्या शर्टमधून कोयते काढले. सोनवणे याने त्याचेकडील कोयत्याने वार केला त्यामुळेे आकाशच्या डोक्यात जखम होऊन रक्त येऊ लागले. बाबूनेही डोक्यात वार केला तेव्हा त्याने डावा हात मध्ये घातला असता हाताचे पंजावर वार होऊन मोठी जखम झाली त्यानंतर सकटने डाव्या हाताचे दंडावर व नाकावर वार केल्याने जखमा झाल्यानंतर पुन्हा सोनवणे याने वार केला तो आकाशने डाव्या हातावर झेलला. त्यामुळे त्याचे बोटामध्ये डाव्या हाताला जखम झाली. जीव वाचवण्यासाठी तो त्यांचे तावडीतून सुटून पळून विठ्ठल - रुक्मिणी मंदिराकडे गेला. तेथे त्याचा भाऊ कोकाटे हा भेेटला त्याने त्याला प्रथम सय्यद हॉस्पिटल थेऊर व नंतर लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले.