शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बाजीराव रोडवर वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 23:33 IST

Pune Accident : बाजीराव रोडवर वाहनाच्या धडकेत एका पादचारी तरुणाचा मृत्यू झाला.

पुणे : बाजीराव रोडवर वाहनाच्या धडकेत एका पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.  पवन संजय गिते (वय २५, रा. खराडी) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. संक्रांतीच्या खरेदीसाठी तुळशीबाग, शनिपार परिसरात महिलांची झुंबड उडाली होती. मृत्यू झालेला तरुण मोबाईलवर बोलत असताना अचानक मिक्सरच्या खाली गेला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. यावेळी तरुणाच्या हातात मोबाईल देखील मिळून आला आहे. याप्रकरणी संबंधित टेम्पो, मिक्सर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय टिकोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजीराव रस्त्यावरून पवन हा पायी चालत शनिवारवाड्याकडे निघाला होता. विश्रामबागवाड्यासमोर एका टेम्पो व पाठीमागे असलेल्या मिक्सर खाली पवन आला. त्याच्या डोक्यावरून मिक्सर गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात हा सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास गर्दीच्या वेळी घडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.अपघाताची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पायी चाललेला तरुण अचानक मिक्सरच्या खाली कसा सापडला हे पोलिसांना लक्षात आलेले नाही. मात्र, त्याच्या हातामध्ये मोबाईल असल्यामुळे तो बोलत त्याच्या खाली सापडला असण्याची शक्यता आहे. तो नेमका या परिसरात कशासाठी आला होता. याप्रकरणी तपास सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे