शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

Pune: फ्रेंडशिपसाठी भररस्त्यात धरला हात; मुलीच्या भावांकडून तरुणाला बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 18:18 IST

मैत्री करण्यासाठी १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा भर रस्त्यात हात पकडून फ्रेंडशीपची मागणी करणार्‍या तरुणाला तिच्या भावांनी चांगलाच चोप दिला

पुणे : मैत्री करण्यासाठी १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा भर रस्त्यात हात पकडून फ्रेंडशीपची मागणी करणार्‍या तरुणाला तिच्या भावांनी चांगलाच चोप दिला. याप्रकरणी खडक पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. शुभम कैलास दारवटकर (वय २२, रा. शुक्रवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम दारवटकर हा गेल्या दोन आठवड्यापासून एका अल्पवयीन मुलीच्या मागे लागला होता. ती शाळेत  जात येत असताना तिच्याशी मैत्री करण्याकरीता मागे मागे येऊन तिच्याकडे टक लावून पहात असे. ही मुलगी शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कस्तुरी चौकातून जात असताना शुभम तिच्या मागे मागे आला.  मै तुम से फ्रेंडशीप करना चाहता हू, तूम मुझसे फ्रेंडशीप करो, असे म्हणून भर रस्त्यात तिचा हात पकडला.

या घटनेची माहिती या मुलीच्या भावांना समजली. तेव्हा त्यांनी शुभम याचा शोध घेत दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गुरुवार पेठेतील झुंजार मित्र मंडळासमोर तिघांनी त्याला गाठले. हाताने, लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले. खडक पोलिसांनी शुभम याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. तर, शुभम दारवटकर याच्या फिर्यादीवरुन तिघाविरुद्ध मारामारी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक