शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

इमारती शेजारून गेलेल्या विद्युत तारांचा शॉक बसल्याने दुसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 13:16 IST

तारांच्या सुरक्षेबाबत कोणतीही काळजी घेतली नसल्याने इमारतीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणी काळभोर : इमारतीच्या शेजारून गेलेल्या विद्युत उच्चदाबाच्या तारांमुळे प्रवाहाचा शॉक बसून आणि दुसऱ्या मजल्यावरून पडून  एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. इमारती शेजारून गेलेल्या तारांच्या सुरक्षेबाबत कोणतीही काळजी घेतली नसल्याने इमारतीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 यादुर्घटनेत शुभम संचित परब ( वय २१ ) याचा मृत्यू झाला आहे. त्याचे मृत्यूस कारणीभूत ठरलेचे कारणांवरून संभाजी दादासाहेब भाडळे ( वय ४२, रा. उरुळी देवाची, ता. हवेली ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर प्रकार १४ नोव्हेंबर रोजी घडला आहे. त्यादिवशी उरुळी देवाची पोलीस चौकीस नियंत्रण कक्षाला पुण्यातून जुना पालखी रोड येथे एकजण इमारतीवरुन खाली पडलेला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, पोलीस हवालदार सागर वणवे व जोशी हे त्याठिकाणी गेले. त्यांनी शुभम परबला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करुन मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मरणाचे कारण हे हेड इंजुरी अर्टिकल प्रिझर्व केमिकल अनालायझर असे नमुद होते. त्यामुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 

या मृत्यु प्रकरणात घटनास्थळी असणाऱ्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम ज्या बांधकाम इमारतीच्या दुसऱ्या मजलाल्यावर गॅलरीत उभा होता. तिच्या शेजारून उच्चदाब विद्युत प्रवाहाच्या तारा गेल्या होत्या. परंतु इमारतीच्या मालकाने त्याबाबत कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेची काळजी घेतली नव्ह्ती. त्यावेळी शुभम हा दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीत उभा राहिला असताना या विद्युत प्रवाहाच्या तारांचा शॉक बसून तो खाली पडला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे साक्षीदारांनी दिलेल्या जबाबावरून सिद्ध झाल्याने इमारतीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरPoliceपोलिसDeathमृत्यूelectricityवीज