अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:09 IST2021-07-23T04:09:36+5:302021-07-23T04:09:36+5:30

पुणे : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणाला खडक पोलिसांनी अटक केली आहे. वृषभ सुधीर शिंदे ...

Young man arrested for trying to seduce a minor girl into marriage | अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक

पुणे : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणाला खडक पोलिसांनी अटक केली आहे.

वृषभ सुधीर शिंदे (वय १९, रा. आंबेगाव पठार) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गुरुवार पेठेतील एका १६ वर्षाच्या मुलीने फिर्याद दिली आहे.

हा प्रकार ३० जानेवारी ते ११ जुलै २०२१ दरम्यान घडला.

आरोपीने फिर्यादी मुलीला आपल्या घरी बोलावून तिला लग्नाचे वचन देऊन तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला. त्यानंतर ही बाब तुच्या घरांच्यांना तसेच मित्र मैत्रिणींना सांगण्याची धमकी दिली. तिला स्वत: चे अश्लिल अवस्थेतील फोटो व व्हिडिओ काढून पाठविण्यास भाग पाडते. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने पुन्हा तिच्यावर अत्याचार केले. शेवटी त्याच्या या अत्याचाराचा कंटाळून या मुलीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Web Title: Young man arrested for trying to seduce a minor girl into marriage