दुचाकी अपघातात तरुण ठार

By Admin | Updated: January 10, 2017 03:44 IST2017-01-10T03:44:41+5:302017-01-10T03:44:41+5:30

मोटारीला ओव्हरटेक करीत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजकाला धडकून चालकाचा मृत्यू झाला.

Young killed in a two-wheeler accident | दुचाकी अपघातात तरुण ठार

दुचाकी अपघातात तरुण ठार

पुणे : मोटारीला ओव्हरटेक करीत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजकाला धडकून चालकाचा मृत्यू झाला. बाणेर रस्त्यावरच्या सदानंद हॉटेलच्या अलीकडील वळणावर रविवारी रात्री दीडच्या सुमारास झालेल्या अपघातात सहप्रवासीही जखमी झाला आहे.
हिमांशू रामकिसन सचान (वय २३, रा. ग्रीन स्क्वेअर, बाणेर) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शुभम सुरेशचंद्र पाल (वय २२, रा. मयूरेश अपार्टमेंट, बालेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. हिमांशू आणि शुभम एकाच दुचाकीवरून जात होते. एका मोटारीला ओव्हरटेक करीत असताना ही दुचाकी दुभाजकाला जाऊन धडकली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने हिमांशूचा जागीच मृत्यू झाला, तर शुभम जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: Young killed in a two-wheeler accident