Young girl preparing for competition exams imprisoned in camera to trying robbery | स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची चोरी कॅमेऱ्यात कैद ; पोलिसांनी घेतला 'हा' पवित्रा 
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची चोरी कॅमेऱ्यात कैद ; पोलिसांनी घेतला 'हा' पवित्रा 

पुणे : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीची चोरी कॅमेऱ्यात कैद झाल्याची घटना पुण्यात घडली आहे.  शहरातील गोपाळकृष्ण गोखले पथ तथा (एफ सी रोड)वरील शिरोळे फॅशन मार्केटमध्ये ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होताना दिसत आहे. 

   याबाबत अधिक माहिती अशी की,  शिरोळे फॅशन मार्केटमधील एका दुकानात लाल टी-शर्ट आणि जीन्स परिधान केलेली एक तरुणी आली. काही वेळ दुकानात घालविल्यानंतर तिने एक टी-शर्ट हातात घेतला. कुणाचे लक्ष नसल्याचे पाहत हा टी-शर्ट तिने बॅगेत कोंबला. आणि बिल न भरता तशीच निघू लागली. हा सर्व प्रकार दुकानातील एका कर्मचाऱ्याच्या लक्षात आला. त्यानंतर संबंधित तरुणीला थांबवून दामिनी पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने तिची चौकशी करून झडती घेतली असताना टी-शर्ट दिसून आला. अखेर या तरुणीला समज देऊन सोडण्यात आले. 


Web Title: Young girl preparing for competition exams imprisoned in camera to trying robbery
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.