...म्हणून तरुणीनं रचला स्वत:च्याच अपहरणाचा बनाव; कारण ऐकून पोलीसही हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 06:51 IST2020-10-06T02:47:09+5:302020-10-06T06:51:41+5:30
आंतरधर्मीय विवाहाला परिवाराचा विरोध

...म्हणून तरुणीनं रचला स्वत:च्याच अपहरणाचा बनाव; कारण ऐकून पोलीसही हैराण
लोणी काळभोर (पुणे) : परधर्मीय मुलाशी विवाह करण्यासाठी कुटुंबीयांनी परवानगी नाकारल्यामुळे युवतीने तिच्या प्रियकराशी संगनमत करून अपहरण घडवून आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हडपसर- सासवड रस्त्यावर दिवे घाटात एका तरुणीचे अपहरण झाल्याचा प्रकार घडला होता. लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार परधर्मातील मुलाशी लग्न करण्यासाठी घरचे परवानगी देत नव्हते. त्यामुळे या मुलीने प्रियकराच्या मदतीने अपहरणाचा बनाव केला. युवतीने आपण आई-वडिलांकडे जाणार नसून प्रियकराबरोबरच राहणार असल्याचे पोलिसांना लिहून दिले आहे.