शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटात ‘हिरो’ व्हायला निघालेला अल्पवयीन मुलगा सापडला दौंडला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 19:00 IST

लहान मुलांना चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरविषयी प्रचंड कुतुहल आहे. काही मुले त्याच ग्लॅमरला भूलुन आयुष्यात टोकाची पावले उचलतात आणि आयुष्य उध्वस्त करून घेतात.

ठळक मुद्देहरियाणातून गोव्याला जात असताना पोलिसांची कारवाई 

दौंड : चित्रपटामध्ये काम करण्याचे स्वप्न उराशी बाळगत कितीतरी मुले यांना घर सोडून आलेले सुपरस्टार म्हणून झळकतात. त्याच सुपरस्टारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत मग काही अल्पवयीन मुले पुढचा मागचा कोणताही विचार न करता घरदार सोडतात. यातून काही मुलांच्या आयुष्याची राखरांगोळी झालेली उदाहरणे देखील कमी नाही. तसाच एक मुलगा हरियाणातून चित्रपटसृष्टीत हिरो होण्यासाठी गोव्याला निघाला होता. मात्र, वेळीच मिळालेल्या माहितीवरुन त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक देवसिंह बाविस्कर यांनी दिली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मुलाचे नाव रतन रामवीर कागडा (वय १५ ) आहे.  रेल्वे पोलीस श्रद्धा पठारे, आनंद वाघमारे , संतोष कांबळे , दत्ताञय खोत , हर्षल तोरणे हे रेल्वे स्थानकात गस्त घालत होते. त्यांना हा मुलगा रेल्वे फलाटावर दिसला. हा मुलगा एकटाच असल्याने पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने नाव पत्ता सांगितला. दरम्यान, त्याने हरियाणा येथून दिल्लीला आल्याचे आणि दिल्लीवरुन गोवा एक्सप्रेसने गोव्याला हिरो बनण्यासाठी निघालो असल्याचे पोलिसांना सांगितले. या मुलाजवळ स्वत: चा  मोबाईल नव्हता. मात्र, त्याला वडिलांचा मोबाईल नंबर तोंडपाठ होता. त्यावरुन पोलिसांनी त्याच्या वडिलांशी संपर्क साधला. लहान मुलांना चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरविषयी प्रचंड कुतुहल आहे. काही मुले तर त्याला भूलुन अगदी टोकाचे पावले देखील उचलतात. परंतु, याताून काही मुले स्वत:हून चुकीच्या मार्गाला लागतात किंवा लावलेही जातात. या वयात त्यांच्या अल्पवयीन बुध्दीला भविष्यात त्यांच्यासोबत घडणाऱ्या घटनांच्या दुष्परिणामांची दाहकता समजत नाही. आणि ते बिनधास्तपणे आई वडिलांसह कुटुंब, शिक्षण यांचा विचार न करता घर सोडतात. आपल्या पाल्याच्या अशा वागण्यामुळे पालक मोठ्या प्रमाणावर अस्वस्थ आहे. रतनचे वडील रामवीर कागडा हे ट्रान्सपोर्ट निरीक्षक आहेत. त्यांनी रतन हरवल्याची तक्रार फतेहाबाद पोलीस ठाण्यात दाखल केली होती. दौंड रेल्वे पोलिसांनी मुलगा सापडल्याची माहिती फतेहाबाद पोलिसांना कळवली. फतेहाबाद पोलीस आणि सापडलेल्या मुलाचे वडील रामवीर हे दौंडला आले. पोलिसांनी लोहमार्ग पोलीस अधिक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर बाबी पूर्ण करुन रतनला ताब्यात देण्यात आले. त्याच्या वडिलांनी लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले.  

टॅग्स :PuneपुणेcinemaसिनेमाPoliceपोलिस