शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुढील काळात आपल्याला बिबट्या समवेतच राहावे लागेल..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 21:24 IST

जंगलापेक्षा उस शेतीचा घेतोय बिबट्या आसरा..

ठळक मुद्देसर्पदंश व विंचूदंशाची संख्या व त्याने जीवितहानी होण्याचे प्रमाण जास्त ‘मानव व वन्यजीव संघर्ष : चिंता व निराकरण’ या विषयावर आयोजित परिषद

पुणे : ऊस शेती हा बिबट्याला आश्रयस्थान म्हणून मिळालेला पर्याय आहे. तो, जंगलापेक्षा ऊस शेतातच अधिक दिसून येत आहे. त्यामुळे या पुढील काळात आपल्याला बिबट्या सोबतच रहायचे असून, ते सहजीवन असेल असे माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांनी सांगितले. बायोस्फिअर्स व वनस्पतीशास्त्र विभाग, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड यांच्या वतीने ‘मानव व वन्यजीव संघर्ष : चिंता व निराकरण’ या विषयावर आयोजित परिषदेत ते बोलत होते. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये, सर्पदंश उपचार तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत, ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील जीवशास्त्रज्ञ अनिरुद्ध चाउजी, वरिष्ठ वन अधिकारी व कुरण विकास संशोधक सुभाष बडवे, जुन्नरच्या सरपंच प्रमिलाताई शिंदे, पुण्याचे उपवनसंरक्षक रमेशकुमार, पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सचिन पुणेकर यावेळी उपस्थित होते.  डॉ. देशमुख म्हणाले, बिबट्याला जंगला व्यतिरिक्त राहण्याचा पर्याय मिळाला आहे. कटू असले तरी आपल्याला या पुढील काळात बिबट्या समवेत रहावे लागणार आहे. येणाऱ्या काळात त्याच्याशी संघर्ष नसून सहजीवन असेल. ‘आगंतुक व उपद्रवी परदेशी वनस्पती फोफावल्यामुळे स्थानिक चारा-वनस्पती कमी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांमध्ये एकप्रकारचा तणाव निर्माण झाला आहे. म्हणून ते जंगल सोडून मानवी वस्तीमध्ये, शेतीमध्ये हस्तक्षेप करतात. त्यामुळे संघर्ष अटळ असल्याचे’ डॉ. पुणेकर म्हणाले. सुभाष बडवे म्हणाले, कुरणांची संख्या कमी होत चालल्यामुळे पाळीव जनावरांना चारा नाही. त्यामुळे ते जंगलात जातात. तिथे वन्य प्राण्यांची ते शिकार बनतात. म्हणून कुरणे वाढवणे आणि चाऱ्याची उपलब्धता वाढविणे आवश्यक आहे. ताडेबातील जीवशास्त्रज्ञ चाउजी म्हणाले, जंगल पर्यटन वाढले पाहिजे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन, त्यांचे जंगलावरील अवलंबित्व कमी होईल. परिणामी मानव-वन्यजीव संघर्ष रोखता येईल. डॉ. राऊत म्हणाले, सर्पदंश व विंचूदंशाची संख्या व त्याने जीवितहानी होण्याचे प्रमाण जास्त आहे. पण सर्पदंश झाल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांसाठी शासनाकडून मदतीची कुठलीही व्यवस्था नाही. शासनाने त्यांना मदत करावी. तसेच, सर्पदंश झाल्यावर काय करायला पाहिजे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे.यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थी व नागरिकांसाठी वेताळ टेकडीवर निसर्ग परिचय फेरी आयोजित करण्यात आली होती. टेकडीवरील स्थानिक, देशी, परदेशी वनस्पती, बुरशी, कीटक, हिवाळ्यात खास येणारे पक्षी, पर्यावरण विषयातील अनेक घटकांची कीटक शास्त्रज्ञ किशोर राऊत व वनस्पती अभ्यासक डॉ. पुणेकर यांनी माहिती दिली. ---------------

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याforestजंगल