पुणे : साडेतीन महिन्यांपूर्वी कोजागरी पौर्णिमेच्या रात्री पाच बछड्यांना कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील पिवळा पट्टेरी वाघ आणि रिद्धी या वाघिणीने जन्म दिला होता. त्यातील एका बछड्याचा मृत्यू झाला तर उरलेली चारही बछडे सुखरूप आहेत. सोमवारी या बछडयांचा नामकरण सोहळा संपन्न झाला. बछड्यांची नावे अनुक्रमे आकाश, गुरु, सार्थक आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जन्म झाला असल्यामुळे मादी बछडीचे नाव पौर्णिमा असे ठेवले आहे. ही सर्व नावे महापौर मुक्ता टिळक यांनी ठेवली आहे. राजीव गांधी प्राणी संग्रहालयात वाघांच्या बछड्यांचे नामकरण विधी उत्साहात साजरा करण्यात आला. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते पान साखर पेढे वाढून रिद्धी या वाघींनी जन्म दिलेल्या बछड्यांचे पौर्णिमा, आकाश, गुरु व सार्थक असे नामकरण करण्यात आले. साडेतीन महिन्यांपुर्वी रिद्धी या वाघिणीने पाच बछड्यांंना जन्म दिला. परंतु दुर्दैवाने एक बछड्याचा प्रसुतीनंतर मृत्यू झाला. प्राणी संग्रहालयामध्ये वाघाच्या बछड्यांचा जन्म ही मोठी उपलब्धी आहे. ......................
हो.... आज आमचं बारसं झालं...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 14:50 IST