शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

होय..! मी ‘दुर्लक्षित’झालोय...तुमचाच.. पेशवेकालीन कात्रजचा तलाव...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 19:27 IST

एकेकाळी पुण्याचे प्रेक्षणीय स्थळ समजले जाणाऱ्या या पेशवेकालीन तलावात सांडपाणी सोडले जात आहे. अशा परिस्थितीत पेशवेकालीन तलावाचा श्वास गुदमरत आहे. ..

ठळक मुद्देया तलावाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींसह महापालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष तलावाच्या सुशोभिकरणासाठी गेल्या काही वर्षात कोटयवधीचा निधीचा खर्च व्यायामासाठी येणाऱ्या तसेच सुटटीच्या दिवशी तलावावर नागरिकांची मोठी संख्या कचऱ्यामुळे व सांडपाण्यामुळे य तलावाचे अस्तित्वच धोक्यात

प्रीती जाधव - ओझा पुणे: पाण्यावर पसरलेले तेलकट तवंग... वाढलेली झाडे-झुडपे....तरंगणाऱ्या प्लास्टिक पिशव्या, पाणी व मद्याच्या बाटल्या... हे चित्र आहे कात्रज परिसरातील पेशवेकालीन तलावाचे...नगरपालिकेने नानासाहेब पेशवे तलाव परिसरात सुशोभीकरण केले. मात्र, पाण्यात साचलेल्या कचरा-घाणीमुळे हे काम तसे ‘पाण्या ’तच गेले आहे. एकेकाळी पुण्याचे प्रेक्षणीय स्थळ समजले जाणाऱ्या या पेशवेकालीन तलावात सांडपाणी सोडले जात आहे. अशा परिस्थितीत पेशवेकालीन तलावाचा श्वास गुदमरत आहे. या तलावाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींसह महापालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे होय.. मी दुर्लक्षित झालोय.. तुमचाच पेशवेकालीन कात्रजचा तलाव अशी भावनिक साद तर हा तलाव महापालिका आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला तर घालत नसेल ना...! नुकत्याच झालेल्या पावसाने पाण्यापेक्षा अधिक आसपासच्या गावांमधील कचरा जमा झाला आहे. विशेष बाब म्हणजे या तलावाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींसह महापालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले असल्याने तलावाच्या कावर थर्माकॉल, प्लास्टिक, तसेच वैद्यकीय कचऱ्याचे घटकही अस्ताव्यस्तपणे पसरलेले असून हा कचरा काढून घेण्यासाठी मागणी तलावाच्या परिसरातील नागरिकांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे केली आहे.या तलावाची स्वच्छता करणे गरजेचे झाले आहे. 

सुशोभित पेशवेकालीन तलाव घाणीच्या विळख्यात कात्रज येथील या तलावात गुजरवाडी, निंबाळकरवाडी, भिलारवाडी तसेच मांगडेवाडी आणि कात्रजच्या घाटमाथ्यावरून येणारे नाले तसेच ओढ्यांचे पाणी येते. त्यात हे ओढे ज्या गावांमधून येतात त्या गावांमध्ये कचरा व्यवस्थापन तसेच सांडपाण्याची योग्य प्रकारे व्यवस्था नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांकडून कचरा तसेच सांडपाणी या नाल्यांमध्येच सोडले जाते. गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे या तलावात हे नाले तसेच ओढ्यांमध्ये साचलेला कचरा थेट या पेशवेकालीन तलावात आलेला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचून दुर्गंधी येत आहे. या तलावातील पाण्यात नागरिक निर्माल्य टाकतात. याव्यतिरिक्त प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या व मद्याच्या बाटल्यांचा खचही दिसून येतो. तलावाला झाडा-झुडपांनी वेढले आहे. लगतच नगरपालिकेने मुलांना खेळण्यासाठी आजी-आजोबा उद्यान उभारले आहे. दिवसा मुले खेळतात, तर रात्री या जागेचा ताबा मद्यपी घेत आहेत. मद्याच्या बाटल्या; तसेच खाद्यपदार्थांच्या पिशव्या तलावातील पाण्यात टाकण्यात येत आहेत. तलावाचे अस्तित्वच धोक्यात  नगरपालिकेने या तलावाचे सुशोभीकरण केले आहे. परिसरात मोफत वायफाय सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे दिवसभर येथे तरुणांची लगबग सुरू असते. प्रेमी युगुलांसाठी हे हक्काचे ठिकाण बनले आहे. सकाळी, सायंकाळी परिसरातील नागरिक येथे फिरण्यास, चालण्यासाठी येतात. लोकांची गरज बनलेल्या या तलावाच्या पाण्यावर प्रचंड घाण पसरली आहे. अस्वच्छतेमुळे सुशोभीकरणाच्या हेतूलाच नख लागले आहे. प्लास्टिकचा कचराही मोठ्या प्रमाणात आहे. हा कचरा काढून घेण्यासाठी मागणी तलावाच्या परिसरातील नागरिकांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे केली आहे. विशेष बाब म्हणजे या तलावाच्या सुशोभिकरणासाठी गेल्या काही वर्षात कोटयवधीचा निधीचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, या वाढत्या कचऱ्यामुळे व सांडपाण्यामुळे य तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष तसेच महापालिकेकडून या उद्यानात सर्वात उंच राष्ट्रध्वज बसविण्यात आलेला असून या भागातील तलावाच्या काठाचे सुशोभिकरणही केलेले आहे. तसेच या ठिकाणी फुलराणीही बसविण्यात आली आहे. त्यामुळे या तलावावर सकाळी आणि सायंकाळी व्यायामासाठी येणाऱ्या तसेच सुटटीच्या दिवशीही नागरिकांची मोठी संख्या असते. मात्र, या तलावाच्या काठावर साचलेल्या कचऱ्यामुळे या तलावाला कचरा डेपोचे स्वरूप आल्याचे चित्र असून या तलावाकडे महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Puneपुणेkatrajकात्रजPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका