शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये तर लॉकडाऊन, होय आता कसं करायचं? ३ लाख ऊस तोडणी कामगारांसमोर प्रश्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 20:42 IST

घरी परतणे झाले कठीण

पुणे: बीडमध्ये १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे ऊसतोडणीसाठी जिल्ह्याबाहेर गेलेले ३ लाख कामगार जिल्ह्याबाहेरच अडकून राहणार आहेत. त्यांना घरी परतण्यासाठी विशेष परवानगी द्यावी अशी मागणी ऊसतोडणी कामगार संघटनांनी केली आहे. 

जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्याकडे महाराष्ट्र राज्य श्रमिक ऊसतोडणी कामगार संघटनेने यासंदर्भात निवेदन दिले. संघटनेचे अध्यक्ष जीवन राठोड यांनी सांगितले की जिल्ह्यातून ५ लाख मजूर साखर कारखाना गाळप हंगामात जिल्ह्याबाहेर जातात. पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र तमीळनाडू या राज्यांमध्येही बीडमधील कामगार आहेत. आता गाळप हंगाम पुर्ण होत आला आहे. कामगारांची घरी परतण्याची वेळ झाली आहे आणि इकडे लॉकडाऊन जाहीर झाला आहे. 

या गरीब कामगारांना आता प्रशासन जिल्ह्याच्या सीमांवरच अडवेल. त्यांना बाहेरून आलात म्हणून प्रवेश दिला जाणार नाही. चार महिने कष्टाचे काम करून घरी परत येणार्यांना अशी वागणूक देणे माणूसकीला धरून होणार नाही. प्रशासन त्यांना त्रास देईल. विलगीकरणाचा आग्रह धरेल व कष्टाने केलेली त्यांची कमाई त्यातच खर्च होईल.अशी भीती राठोड यांनी व्यक्त केली. 

बरेच कामगार परत आले आहेत, मात्र आता सगळीकडचाच गाळप हंगाम संपत आल्याने परतणार्या कामगारांची संख्या फार मोठी असेल. त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून वेगळा निर्णय घ्यावा, काम करत असताना या कामगारांमुळे कोणाला कोरोनाचा त्रास झाला असे एकही ऊदाहरण एकाही कारखान्यावर नाही असे राठोड यांनी सांगितले. जिल्हाधिकारी जगताप यांनी यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याSugar factoryसाखर कारखानेLabourकामगारcollectorजिल्हाधिकारी