शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

औंदाचं साल कमी पावसाचं, सॅसकॉफचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 06:26 IST

पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात यंदा सरासरीपेक्षा सर्वसाधारणपणे ४० टक्के कमी पाऊस होईल, असा अंदाज ...

पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात यंदा सरासरीपेक्षा सर्वसाधारणपणे ४० टक्के कमी पाऊस होईल, असा अंदाज साउथ एशियन क्लायमेट आऊटलुक फोरम (सॅसकॉफ) ने व्यक्त केला आहे़ राज्यातील बहुतांश धरणे ही सह्याद्रीच्या डोंगररांगामधून उगम पावणाऱ्या नद्यांवर आहेत़ या परिसरात सरासरीच्या तुलनेत ४० टक्क्यांपर्यंत पाऊसमान कमी होण्याची शक्यता असल्यामुळे या धरणांमधील पाणी जपून वापरण्याची गरज निर्माण झाली आहे. दक्षिण आशियातील देशांनी मिळून हवामानाच्या दीर्घकालीन अंदाज तयार करण्यासाठी सॅसकॉफ संघटनेची स्थापना केली. यावेळचे १४ वे सॅसकॉफचे अधिवेशन नेपाळमधील काठमांडू येथे १८ ते २३ एप्रिल दरम्यान झाले़ या संस्थेने आगामी पावसाळ्याच्या काळातील पावसाचे विभागावर अंदाज दिले आहेत़ या अंदाजानुसार महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याचा काही भाग येथे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे़गेल्या वर्षी २०१८ च्या पावसाळ्यात महाराष्ट्रातील चारही हवामान विभागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता़ कोकण, गोवा(-१ टक्के), मराठवाडा (-२२ टक्के), मध्य महाराष्ट्र (-९ टक्के) आणि विदर्भ (-८ टक्के) इतका कमी पाऊस झाला होता़ यामुळे राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात आगामी मॉन्सूनच्या काळात कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे़ या अंदाजानुसार धरणे पूर्ण भरण्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे़ आगामी मॉन्सूनचा अंदाज आशादायक नसल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी चिंताजनक परिस्थिती उद्भवू शकते़हवामान विभागाने दीर्घकालीन चार महिन्यात सरासरीच्या ९६ टक्के इतका पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे़ त्याच वेळी त्यात ५ टक्के फरक होऊ शकतो, असे गृहीत धरले आहे़ तसेच सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची ४९ टक्के शक्यता व्यक्त करण्यात आली आहे़सॅसकॉफच्या अहवालानुसार कोकण, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे़ हा अहवाल अंतिम नसला तरी तो धोक्याचा इशारा देणारा आहे़ विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील धरणातील पाणीसाठ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो़-डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ़

टॅग्स :RainपाऊसPuneपुणे