श्रीक्षेत्र थापलिंग देवस्थानची यात्रा यंदा कोरोनामुळे रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:10 IST2021-02-05T05:10:16+5:302021-02-05T05:10:16+5:30
दरवर्षी पौष पौर्णिमेला श्रीक्षेत्र थापलिंग गडावर खंडोबा देवाची यात्रा दोन दिवस भरते. पुणे-नगर जिल्ह्यातील लाखो भाविक दोन दिवस थापलिंग ...

श्रीक्षेत्र थापलिंग देवस्थानची यात्रा यंदा कोरोनामुळे रद्द
दरवर्षी पौष पौर्णिमेला श्रीक्षेत्र थापलिंग गडावर खंडोबा देवाची यात्रा दोन दिवस भरते. पुणे-नगर जिल्ह्यातील लाखो भाविक दोन दिवस थापलिंग गडावर येऊन दर्शन घेतात. यंदा मात्र सर्वत्र कोरोनाचे सावट आहे. मागील काही दिवसांत जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील अनेक नागरिकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवार (दि. २८) व शुक्रवार (दि. २९) ही दोन दिवसांची यात्रा रद्द करण्यात आली आहे .तसेच शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन केवळ धार्मिक विधी मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत संपन्न होणार आहेत. याबाबत मंचर येथील प्रांताधिकारी कार्यालयात श्री थापलिंग देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व प्रांताधिकारी यांच्यात बैठक झाली. या वेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम, प्रांताधिकारी सारंग कोडोलकर, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, नागापूर गावच्या सरपंच सुजाता नामदेव रिठे , ट्रस्टचे पदाधिकारी विश्वस्त उपस्थित होते.
यात्रा रद्द झाली असल्याने भाविकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.पौष पोर्णिमेला दोन दिवस भरणारी नागापूर ( ता. आंबेगाव ) येथिल थापलिंग यात्रा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे .अशी माहीती थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली .