यशवंतरावराजे होळकर यांनी घेतले कुलदैवत खंडेरायाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:11 IST2021-02-05T05:11:02+5:302021-02-05T05:11:02+5:30
जेजुरी शहर व येथील धार्मिक रूढी ,संस्कार परंपरा, ग्रामस्थ, मानकरी यांचे आणि होळकर घराण्याचे शेकडो वर्षांचे ऋणानुबंध आहेत. ऐतिहासिक ...

यशवंतरावराजे होळकर यांनी घेतले कुलदैवत खंडेरायाचे दर्शन
जेजुरी शहर व येथील धार्मिक रूढी ,संस्कार परंपरा, ग्रामस्थ, मानकरी यांचे आणि होळकर घराण्याचे शेकडो वर्षांचे ऋणानुबंध आहेत. ऐतिहासिक जेजुरीच्या जडणघडणीत महाराजा होळकर घराण्याचा मोलाचा वाटा आहे. इतिहासपुरुषांनी निर्माण केलेली ऐतिहासिक चिंचेची बाग, होळकर तलाव, होळकर वाडा, मल्हार गौतमेश्वर मंदिर तसेच गडाचा जीर्णोद्धार शहराच्या वैभवात भर घालतात .अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेली आणि १७व्या शतकाच्या मध्यावधीत त्यांची राजधानी असलेल्या महेश्वर (इंदूर -मध्यप्रदेश) येथे सध्याचा होळकर परिवार वास्तव्यास आहे. यातीलच थेट १६ वे वंशज युवराज यशवंतरावराजे यांनी जेजुरीत येत खंडेरायाची पूजा-अभिषेक ,तळीभंडार ,जागरण गोंधळ आदी धार्मिक विधी करीत कुलधर्म -कुलाचार केला .धार्मिक विधींचे पौरोहित्य प्रकाश खाडे यांनी केले. या वेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत, अमरजितसिंह बारगळ जहागीरदार ,रामभाऊ लांडे ,देवसंस्थानचे विश्वस्त शिवराज झगडे,संदीप जगताप ,पंकज निकुडेपाटील ,खांदेकरी मानकरी मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे ,प्रमुख वतनदार इनामदार राजेंद्र पेशवे,सचिन पेशवे, विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे,उद्योजक उत्तम झगडे, सतीश कदम,राजेंद्र चौधरी,देवसंस्थान मुख्याधिकारी राजेंद्र जगताप, ग्रामस्थ, मानकरी, खांदेकरी, पुजारी, सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
जेजुरीच्या भेटीत ऐतिहासिक होळकर वाडा ,तलाव ,चिंचेची बाग ,मल्हार गौतमेश्वर मंदिर , जानाई मंदिर ,आदी ऐतिहासिक स्थळांना भेट दिली .धार्मिक विधीच्या कार्यक्रमाचे आयोजन देवसंस्थानच्या वतीने करण्यात आले होते.
१) होळकर घराण्याचे १६ वे वंशज युवराज यशवंतराव राजे जेजुरीगडावर तळीभंडार करताना २) युवराज यशवंतरावराजे यांचा सन्मान करताना देवसंस्थान विश्वस्त व मान्यवर , ३) खंडेरायाचे देवदर्शन घेताना युवराज यशवंतराव राजे.