‘कॅट’ परीक्षेत पुण्याचा यश चौधरी अव्वल

By Admin | Updated: January 10, 2017 03:49 IST2017-01-10T03:49:52+5:302017-01-10T03:49:52+5:30

देशातील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) या संस्थांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेत

Yash Chaudhary tops in 'CAT' examination | ‘कॅट’ परीक्षेत पुण्याचा यश चौधरी अव्वल

‘कॅट’ परीक्षेत पुण्याचा यश चौधरी अव्वल

पुणे : देशातील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) या संस्थांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेत कॉलेज आॅफ इंजिनिअरिंंगमध्ये (सीओईपी) शिक्षण घेत असलेला यश चौधरी हा विद्यार्थी अव्वल ठरला आहे. या परीक्षेत यशसह देशभरातील २० विद्यार्थ्यांना १०० गुणांकन मिळाले आहे.
देशातील १३८ केंद्रांवर सुमारे १ लाख ९५ हजार विद्यार्थ्यांनी कॅट परीक्षा दिली होती. दि. ४ डिसेंबरला आॅनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली होती. सोमवारी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्याला एसएमएसद्वारे निकालाची माहिती देण्यात आली. उपलब्ध माहितीनुसार देशातून २० विद्यार्थ्यांना १०० गुणांकन मिळाले असून, सर्व अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी आहेत. त्यामध्ये एकाही मुलीचा समावेश नाही. या २० जणांमध्ये ‘सीओईपी’त बी.टेक. अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेला यश चौधरी या विद्यार्थ्याचा समावेश आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात अव्वल येण्याचा मान मिळविला आहे.
‘शाळेत असल्यापासून गणिताची आवड आहे. गणिताच्या अनेक परीक्षा दिल्या आहेत. त्यामुळे एमबीए जाण्याचा निर्णय घेतला. त्यातही आयआयएममध्येच प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी कॅट परीक्षा देणे आवश्यक होते. त्यानुसार सात-आठ महिन्यांपासून परीक्षेची तयारी केली. १०० गुणांकन मिळेल, असे वाटले नव्हते. त्यामुळे खूप आनंद झाला आहे,’ असे यश म्हणाला. अहमदाबाद व बंगळुरू आयआयएममधून मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यानंतर प्रवेश निश्चित होईल, असे यशने सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Yash Chaudhary tops in 'CAT' examination