शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

आरमाराविषयीचे लेखन विखुरलेले

By admin | Updated: March 30, 2017 02:45 IST

आजवरचा इतिहास केवळ जमिनीवरील लढायांवर केंद्रित झाला आहे. समुद्रातील लढायांकडे दुर्लक्ष झाले आहे.

पुणे : आजवरचा इतिहास केवळ जमिनीवरील लढायांवर केंद्रित झाला आहे. समुद्रातील लढायांकडे दुर्लक्ष झाले आहे. आरमार धोरण या दृष्टिकोनातून इतिहासाचे विश्लेषण झालेले नाही. मराठ्यांच्या आरमाराविषयीचे लेखन विखुरलेल्या स्वरूपात आहे, असे मत मुंबईतील इतिहास अभ्यासक आणि लेखक डॉ. सचिन पेंडसे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने सचिन पेंडसे यांच्या ‘मराठा आरमार : एक अनोखे पर्व’ या पुस्तकास शं. ना. जोशी पुरस्काराने गौरवण्यात आले. ज्येष्ठ प्राच्यविद्या अभ्यासक डॉ. अरुणचंद्र पाठक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, परीक्षक डॉ. सदाशिव शिवदे, गणेश राऊत आदी उपस्थित होते.पेंडसे म्हणाले, ‘‘केवळ पुस्तके वाचून किंवा इंटरनेटवर माहिती आणि फोटो पाहून इतिहासाचा आणि किल्लयांचा अभ्यास करता येत नाही. त्यासाठी ऐतिहासिक ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन अभ्यास आवश्यक असतो. तसेच, या अभ्यासाचा आजच्या परिस्थितीशी संबंध जोडता यायला हवा. भारताचा नाविक इतिहास खूप प्राचीन आहे. त्याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे.’’पाठक यांनी आरमार इतिहासाचा मागोवा घेतला. ते म्हणाले, ‘‘शिवाजी महाराजांच्या नौदल आरमाराचे महत्त्व बंगालच्या इतिहासकारांनी समजावून सांगितले. सागरी आक्रमण करून पोर्तुगीज भारतात आले, तेव्हा त्यांना अडवणारी कोणतीही समर्थ शक्ती अस्तित्वात नव्हती. या आक्रमकांना सत्तेच्या पलीकडे जाऊन धर्मप्रचाराचे काम करायचे होते. त्यासाठी त्यांनी नागरिकांवर अन्याय, अत्याचार केले. भारतीय इतिहास जागतिक नौकायुद्धाला प्रेरणा देणारा आहे.’’शिवदे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजीमहाराज, कान्होजी आंग्रे आणि रामचंद्रपंत अमात्य यांनी सागरी आरमाराचे महत्त्व जाणले होते. ते महत्त्व पेंडसे यांनी अधोरेखित केले. मराठ्यांचे आरमार कसे बुडाले, हे त्यांनी लेखनातून निर्भीडपणे मांडले आहे. इतिहास अभ्यासकाला निर्भीडपणे निष्कर्ष नोंदवावे लागतात. ते त्यांने निर्भयतेने नोंदवावेत.’’ प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.