कासारआंबोली येथे उभारणार कुस्ती आखाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:11 IST2021-03-26T04:11:43+5:302021-03-26T04:11:43+5:30

जिल्हा नियोजन मंडळाच्या नियोजनामधून पंधरा लाख रुपये निधी खर्च करून कासारआंबोली येथे कुस्ती आखाडा बांधण्यात येणार आहे. तेव्हा या ...

Wrestling arena to be set up at Kasaramboli | कासारआंबोली येथे उभारणार कुस्ती आखाडा

कासारआंबोली येथे उभारणार कुस्ती आखाडा

जिल्हा नियोजन मंडळाच्या नियोजनामधून पंधरा लाख रुपये निधी खर्च करून कासारआंबोली येथे कुस्ती आखाडा बांधण्यात येणार आहे. तेव्हा या कुस्ती आखाड्याचे भूमिपूजन हे नुकतेच ओझरकर यांच्या हस्ते झाले.

या वेळी माजी सभापती महादेव कोंढरे, सुनील वाडकर, जि. प. सदस्य अंजली कांबळे, शिवसेना नेते नानासाहेब शिंदे,भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राम गायकवाड, कासारआंबोलीचे सरपंच सचिन धुमाळ, उपसरपंच स्वप्निल शिंदे, ग्रामविकास अधिकारी ए. आर. जगताप, ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा मारणे, उमेश सुतार, रंजीत गायकवाड, शंकर सुतार, रेश्मा गायकवाड, प्रीती शिंदे, माधुरी धुमाळ, छाया भिलारे, पूजा सुतार, स्वप्नील कांबळे, माजी सरपंच राजेंद्र मारणे उपस्थित होते.

-----------------

फोटो ओळ : कासारआंबोली येथे मान्यवरांच्या हस्ते कुस्ती आखाड्याचे उद्घाटन करण्यात आले.

Web Title: Wrestling arena to be set up at Kasaramboli