शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक पर्यावरण दिन विशेष : ह्या गावाची गोष्टच न्यारी.. लोकसंख्या एवढी येथे वनराई..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 16:53 IST

दौंड तालुक्यातील एक वेगळा गाव किंवा पर्यावरण समृद्ध गाव म्हणून जिल्ह्यामध्ये समोर येत आहे...

ठळक मुद्दे अडीच हजार झाडांची लागवड अन् जोपासना

- प्रकाश शेलार-  

केडगाव : गलांडवाडी (ता. दौंड) येथील गावामध्ये गावच्या लोकसंख्येएवढी झाडे गावाने जोपासली आहेत. गावाची लोकसंख्या सुमारे २५00 असून, अडीच हजार झाडे गावांनी लागवड केली आहे. विशेष म्हणजे, ती झाडे टिकवली देखील आहे. त्यामुळे दौंड तालुक्यातील एक वेगळा गाव किंवा पर्यावरण समृद्ध गाव म्हणून जिल्ह्यामध्ये समोर येत आहे.सुमारे आठ वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी जितकी लोकसंख्या तितकी झाडे, हा संकल्प केला आणि बावीस फाटा येथून गावापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली. विशेष म्हणजे, ठिबक सिंचन पद्धतीने ती सर्व झाडे जोपासलेली आहेत. त्यामुळे गावामध्ये प्रवेश करतानाच सुमारे पाच किलोमीटर अंतरावर ती दुतर्फा  झाडीमुळे त्याची सावली पडते व गावातील प्रवेश अतिशय सुखद होतो. गावाच्या बाजूला जाणाºया तीनही रस्त्यांवर गलांडवाडी, ता. खुटबाव, गलांडवाडी ते  पारगाव,तसेच गलांडवाडी ते देलवडी या ठिकाणी दुतर्फा झाडे लावलेली आहेत. ..........

राजकारण बाजूला ठेवून कार्य... गावाला यानिमित्त पर्यावरण समृद्ध गाव, विकास रत्न यासारखे राज्यपातळीवरील वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत. यासंदर्भात, गावच्या सरपंच पल्लवी कदम म्हणाल्या की, गाव करील ते राव काय करेल, या भावनेतून ग्रामस्थ एकत्रित येऊन योजनेची आखणी करतात. त्याचे नियोजन ठरल्याप्रमाणे होते. 

राजकारणापुरते राजकारणी, इतर वेळेस समाजकारण ही या गावाची ख्याती असून, गावातील अपवाद वगळता बहुतांशी निवडणुका बिनविरोध होतात. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी आदर्श सांसद  ग्राम म्हणून हे गाव दत्तक घेतले आहे. सर्वांच्या सहकार्यातून गावचा विकास प्रगतीपथावर आहे........माजी सरपंच उत्तम खाडे यांच्या संकल्पनेतून ही झाडे लावलेली आहेत. विद्यमान सदस्य व ग्रामस्थांनीसुद्धा ही झाडे जोपासलेली आहेत. ४माजी सरपंच ज्योती  शितोळे यांच्या प्रयत्नांतून गावांमध्ये पर्यावरण संतुलित ५० कुटुंबांनी गोबरगॅस उभारलेला आहेत, त्यामुळे गॅसची बचत होतेच परंतु पर्यावरणाचेही रक्षण केले जाते.

टॅग्स :Puneपुणेenvironmentवातावरण