शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे' : नाल्याच्या पाण्यावर पोसली २७ हजार झाडांची वनराई : 'ग्रीन थंब'चा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 06:45 IST

कोविड काळात नाल्यावर फुलले नंदनवन..... 

लक्ष्मण मोरे

 पुणे : नाल्यामधून नदीपात्रात जाणाऱ्या मैलापाण्यामुळे खालील गावांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हे पाणी नदीमध्ये जाऊ नये याकरिता कोविड काळात घोरपडी येथील सोपानबागे शेजारील नाल्यावर सुरू झाला अनोखा प्रयोग. नाला खोलीकरण-रुंदीकरण करून  दीड वर्षात तब्बल २७ हजार झाडे लावण्यात आली. नाल्याचे पाणी वळवून पाच तळ्यांमध्ये आणण्यात आले. हे पाणी झाडांना देण्यात आले. आजमितीस याठिकाणी पपई, पेरू, केळी, नारळ आदी फळझाडे लगडली आहेत. तर, अनेक प्रकारची फुलझाडे बहरून डोलू लागली आहेत. सगाचीही लागवड करण्यात आली आहे. ही किमया साधली आहे 'ग्रीन थंब' या संस्थेच्या पुढाकारातून. लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) सुरेश पाटील यांच्या ग्रीन थंब संस्थेने यापूर्वी खडकवासला धरणातील गाळ काढून तेथेच सुंदरशी वनराई फुलवली आहे. कोरोना काळात सर्वाधिक आवश्यकता भासते आहे ती ऑक्सिजनची आणि या नाला गार्डनमध्ये ऑक्सिजन पार्क निर्माण झाले आहे. या उपक्रमात अनेक पर्यावरण प्रेमी गटही सहभागी झाले आहेत. लोकसहभागातून याठिकाणी जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले. विविध प्रजातींची तब्बल २७ हजार झाडे लावण्यात आली. यामध्ये १३ हजार बांबूच्या झाडांचा समावेश आहे. तब्बल दोन किलोमीटरचा परिसर हिरवागार आणि निसर्गरम्य करण्यात आला आहे. -----नाल्याच्या पाण्यामध्ये नायट्रोजन, कॅल्शियम यासोबतच झाडांना आवश्यक असलेली सर्व पोषणमूल्ये असल्याने झाडांना त्याचा फायदा झाला. ही झाडे आठ नऊ महिन्यांची असली तरी त्याची वाढ आठ ते दहा वर्षांची झाडे असल्यासारखी झाली आहे. वर्षभरातच झाडांना फळे - फुले धरू लागली आहेत. नाल्याच्या पाण्यावर फुलवलेली ही बाग पाहून अनेक तरुण आणि उत्साही नागरिक या कामात जोडले जाऊ लागले आहेत.

-----पुण्यामध्ये महत्वाचे सात ओढे आहेत. त्यांचे आता नाले-गटार झाले आहेत. यातील हा नाला एक आहे. मागील वर्षी शहरात पूर आलेला असतानाही या नाल्याचे खोलकरण आणि रुंदीकरण करण्यात आल्याने इथे मात्र पूर आला नाही. तसेच झाडेही सुरक्षित राहिली.-----या कामामध्ये प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी मोठी मदत केली. त्यांनी ही वनराई फुलविण्यासाठी यंत्र सामुग्री दिली आहे. या नाल्याची वनराई आता भैरोबानाल्यापर्यंत वाढविली जाणार आहे. या कामासाठीही पाटेकर यांनी मदत देण्याची तयारी दर्शविली आहे.-----पूर्वी या नाल्याचा परिसर रुक्ष होता. याठिकाणी झाडांची लागवड करण्यात आली. मोरांसाठी मक्याची झाडे लावण्यात आली. तर, पोपटांसाठी सूर्यफूल लावण्यात आले. आता या बागेत मोर, पोपट, चिमण्या, बुलबुल आदी पक्षी स्वच्छंदी विहार करीत आहेत.

----मी माझ्या मित्रांच्या सोबतीने या बागेत आलो होतो. लेफ्ट. कर्नल पाटील साहेबांनी उभ्या केलेल्या कामामुळे मी भारावून गेलो आहे. मी या कामात सहभागी झालो असून निसर्गठेवा जपण्यासाठी आणि हे नंदनवन आणखी फुलविण्यासाठी या मोहिमेत काम करीत आहे. भविष्यात ही बाग भैरोबा नाल्यापर्यंत विकसित करण्याचे नियोजन केले आहे. पुणेकरांना अभिमान वाटावा असा नैसर्गिक ठेवा याठिकाणी निर्माण झाला आहे.- वजीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नागपूर शहर, रा. पुणे------नदीपात्रातून जाणाऱ्या आपल्या मैलापाण्यामुळे पुढील ग्रामस्थांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना विविध आजार होत आहेत. नदीपात्रात हे पाणी जाऊ नये याकरिता नाल्याचे पाणी वळविण्यात आले. पाच तळ्यांमधून हे पाणी झाडांना देण्यात येत आहे. याठिकाणी २७ हजार झाडे लावण्यात आली. नाल्याच्या पाण्यावर ही बाग जोपासण्याचा यश आले आहे. केवळ लोकसहभागातून हें शक्य झाले आहे. नागरिकांनी आपापल्या शहरात-भागात वनराई उभी करण्यासाठी पुढाकार घ्यावा. येणाऱ्या पिढीला 'ऑक्सिजन' देऊयात.- सुरेश पाटील, लेफ्ट. कर्नल (निवृत्त), संस्थापक, ग्रीन थंब

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरणWaterपाणीNatureनिसर्ग