जागतिक बँक ‘सल्लागार’

By Admin | Updated: August 14, 2015 03:08 IST2015-08-14T03:08:32+5:302015-08-14T03:08:32+5:30

शहरांमधील नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारून शाश्वत विकास तसेच पर्यावरणपूरक शहरे विकसित करण्यासाठी केंद्र शासनाने हाती घेतलेल्या ‘अमृत’ अटल नवनिर्माण

World Bank 'Advisor' | जागतिक बँक ‘सल्लागार’

जागतिक बँक ‘सल्लागार’

सुनील राऊत, पुणे
शहरांमधील नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारून शाश्वत विकास तसेच पर्यावरणपूरक शहरे विकसित करण्यासाठी केंद्र शासनाने हाती घेतलेल्या ‘अमृत’ अटल नवनिर्माण आणि शहर परिवर्तन मिशन योजनेसाठी पुणे महापालिकेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी जागतिक बँक महापालिकेची सल्लागार बनणार आहे. त्यासाठी येत्या २० आॅगस्ट रोजी बँकेचे प्रतिनिधी महापालिकेस भेट देणार असून, याबाबतच्या अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. या शिवाय या योजनेमध्ये महापालिकेकडून प्रस्तावित केल्या जाणाऱ्या प्रकल्पांसाठी बँकेकडून आर्थिक मदतही करण्याची तयारी दर्शविली आहे.
मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने आघाडी सरकारने शहरांच्या विकासासाठी सुरू केलेली जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना (जेएनएनयूआरएम) बंद केली. याच वेळी या योजनेच्या धर्तीवर केंद्र शासनाने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने अटल मिशन फॉर रिज्युवेशन अँड अर्बन ट्रान्स्फॉरमेशन म्हणजेच ‘अमृत मिशन’ या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेतंर्गत देशभरातील तब्बल ५०० शहरांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी निधी पुरविला जाणार असून त्यासाठी केंद्रीय अंदाजपत्रकात तब्बल ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील ४३ शहरांची निवड झाली असून पुण्यासह , पिंपरी-चिंचवड शहरांचा स्वतंत्र समावेश करण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रकही राज्य शासनाने नुकतेच जारी केले आहे. त्यानुसार, राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली नसली तरी, निवड झालेल्या शहरांंनी या योजनेतील सहभागासाठी शहराचा सेवास्त सुधारणा आराखडा अर्थात ‘स्लिप’ (सर्व्हिस लेवल इम्प्रूव्हमेंट प्लान) तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: World Bank 'Advisor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.