शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

बांधकाम परवानगीबाबत कार्यशाळा, अनधिकृत बांधकाम केल्यास काळ्या यादीत टाकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 2:50 AM

अनधिकृत बांधकामात समाविष्ट सर्व जणांवर कारवाई करून काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही पीएमआरडीएच्या वतीने केली जाणार आहे. तसेच अजामीनपात्र गुन्हा दाखल करून ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा देखील या कायद्यान्वये आहे.

पुणे : अनधिकृत बांधकामात समाविष्ट सर्व जणांवर कारवाई करून काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही पीएमआरडीएच्या वतीने केली जाणार आहे. तसेच अजामीनपात्र गुन्हा दाखल करून ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा देखील या कायद्यान्वये आहे. अनधिकृत बांधकामांची माहिती वेळेत न दिल्यास तालुकानिहाय ग्रामसेवक, पोलीस पाटील व कोतवाल यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी दिला आहे.

पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ येथील भेगडे लॉन्स सभागृह येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजता कार्यशाळा पार पडली. यामध्ये अनधिकृत बांधकाम प्रतिबंध, नियंत्रण, निष्कासन व प्रधानमंत्री आवास योजना, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम निष्कासन कारवाई, जनजागृती व आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरे बांधण्यास अनुदान (बीएलसी) स्वरूपातील सर्वेक्षण व माहिती देण्यात आली. पीएमआरडीएचे महानगर नियोजनकार विजयकुमार गोस्वामी, अपर जिल्हाधिकारी मिलिंद पाठक, पोलीस निरीक्षक राजकुमार शेरे, मावळचे तहसीलदार रणजित देसाई, पंचायत समिती सभापती गुलाबराव म्हाळस्कर, उपसभापती शांताराम कदम, भाजप तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे उपस्थित होते. विजयकुमार गोस्वामी म्हणाले, बांधकाम परवानगी नियमित करण्यासाठी ७ आॅक्टोबर २०१७ च्या शासन निर्णयनुसार दंड भरून ते नियमित करण्यासाठी प्रक्रिया समजावून घ्याव्यात. बांधकामाची सध्य स्थिती, परवानगी व झोन पाहूनच नागरिकांनी पुढील कार्यवाही करावी. अन्यथा विनापरवानगी सुरु असलेल्या बांधकामांना दंड आकारून कायदेशीर कारवाई केली जाईल. प्रश्नोत्तरांचा तासामध्ये मावळ ग्रामस्थांनी बांधकाम परवानगी, रस्ते व अनधिकृत बांधकाम याविषयी प्रश्न उपस्थित करून शंकाचे निरसन केले.अनधिकृत बांधकाम प्रकरणी फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे. अनधिकृत बांधकामधारकांना निष्कासनपूर्वी देण्यात आलेल्या नोटिसांना २४ तासांत उत्तर देणे गरजेचे आहे. अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठी ग्रामसेवकांनी तत्परता दाखवावी. बांधकाम नियमनाकुल असल्यास तत्काळ परवानगी द्यावी. स्वस्तातील बांधकामांच्या खोट्या जाहिराती व भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये.

- मिलिंद पाठक, अपर जिल्हाधिकारी, पीएमआरडीए 

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीए