शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

संतविचारांची पुण्यात कार्यशाळा; वारकरी संप्रदायाचे विचार रुजविण्याच्या उद्देशाने तज्ज्ञांचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 13:45 IST

वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान आणि संतांचे विचार तरुण पिढीत रुजविण्याच्या उद्देशाने शनिवारी (ता. २३) पुण्यातील पत्रकार भवन येथे राज्यस्तरीय संतविचार अभ्यासवर्ग आयोजन केले आहे.

ठळक मुद्देविभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते होणार राज्यस्तरीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन होणार संत साहित्याचे अभ्यासक, जेष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांचे बीजभाषण

पुणे : वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान आणि संतांचे विचार तरुण पिढीत रुजविण्याच्या उद्देशाने शनिवारी (ता. २३) पुण्यातील पत्रकार भवन येथे राज्यस्तरीय संतविचार अभ्यासवर्ग आयोजन केले आहे. संत साहित्यातील ज्येष्ठ अभ्यासक, उपासक या अभ्यासवर्गास मार्गदर्शन करणार आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, चोपदार फाउंडेशन, वारकरी सेवा संघ आणि व्यसनमुक्त युवक संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या या राज्यस्तरीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन शनिवारी सकाळी दहा वाजता विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास उद्योजक युवराज ढमाले, प्रफुल्ल तावरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या वेळी संत साहित्याचे अभ्यासक, जेष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांचे बीजभाषण होईल. दुपारी बारा वाजता संतविचार दैववादी व निष्क्रिय करणारा आहे का, या विषयावर ज्येष्ठ कीर्तनकार रामभाऊ महाराज राऊत हे मार्गदर्शन करतील. दुपारी दोन वाजता संतविचार व सामाजिक बांधिलकी या विषयावर ज्येष्ठ कीर्तनकार सुधाकर महाराज इंगळे हे तर दुपारी तीन वाजता संत साहित्याचे अभ्यासक सचिन पवार हे संतांचे सामाजिक योगदान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वंशपरंपरागत चोपदार राजाभाऊ चोपदार, तुरुंग पोलिस महासंचालक विठ्ठलराव जाधव, मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभ्यासवर्गाची सांगता होईल, अशी माहिती संयोजक रामभाऊ चोपदार, किशोर कामठे, अविनाश सूर्यवंशी यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणे