शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव वाहनाने कामगारास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 21:50 IST

पुणे नाशिक महामार्गावर येथे भरधाव मोटार कारच्या धडकेने पादचारी कामगाराचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देचाकण पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल

कुरुळी : पुणे नाशिक महामार्गावर येथे भरधाव मोटार कारच्या धडकेने पादचारी कामगाराचा मृत्यू झाला. ही शनिवारी पहाटेच्या वेळी घडली. अपघातानंतर संबंधित चारचाकी तशीच पुढे नाशिक दिशेने पसार झाली. या प्रकरणी  (दि.२७) चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   पोलिसांनी दिलेल्या माीहतीनुसार,  लक्ष्मण मारुती कोंपलवाड ( वय ४४, सध्या रा. कुरुळी, सोनवणे वस्ती, ता. खेड, मूळ रा. नायगाव जि. नांदेड) असे अपघातात ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत गोविंद विश्वंभर कोंपलवाड ( वय २१, सध्या रा. कुरुळी, ता. खेड, मूळ रा. नांदेड) याने चाकण पोलिसांत फिर्याद दिली आहे. लक्ष्मण हे सोमवारी (दि.२३) सकाळी सहाचे सुमारास पुतण्या गोविंद याच्यासह नेहमीप्रमाणे चाकण एमआयडीसी मधील स्पायसर कंपनीत कामावर जाण्यासाठी निघाले होते. पुणे नाशिक महामार्गावर कुरुळी ( ता. खेड) हद्दीत रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना पुणे बाजू कडून नाशिक बाजूकडे जाणाऱ्या भरधाव मोटारीने (क्र. एम एच १४/  ५४२५) (पूर्ण क्रमांक निष्पन्न नाही) त्यांना चिरडले. अपघातानंतर भरधाव मोटार पुढे जाऊन काही सेकंद थांबली व पुन्हा सुसाट वेगात तशीच पुढे नाशिक दिशेने निघून गेली. गोविंद याने काही मित्रांच्या मदतीने जखमी चुलते लक्ष्मण यांना यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. चाकण पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला. असून उपलब्ध झालेल्या मोटारीच्या क्रमांकावरून या बाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे .  

टॅग्स :Crimeगुन्हाAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू