कामगारांनी मालकावर केले कोयत्याने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST2021-06-09T04:14:22+5:302021-06-09T04:14:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नेमून दिलेले काम करण्यास सांगितल्याने चौघांनी मालकावर कोयत्याने वार करून लाकडी स्टंप व ...

कामगारांनी मालकावर केले कोयत्याने वार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नेमून दिलेले काम करण्यास सांगितल्याने चौघांनी मालकावर कोयत्याने वार करून लाकडी स्टंप व बांबूने मारहाण केली. ही घटना नऱ्हे येथील भंडारी भोसले इंडस्ट्रीज भंगार दुकानासमोर ४ जूनला रात्री घडली.
याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी रोहित चौगुले (वय २१) आणि तुषार चव्हाण (वय २१, दोघे रा. नर्हे) यांना अटक केली असून त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत संदीप नाईक (वय ४३, रा. नऱ्र्हे) यांनी फिर्याद दिली. नाईक यांच्या कंपनीत कामाच्या वेळी तुषार चव्हाण हा इतरत्र फिरत असल्याचे दिसले. त्यावेळी नाईक यांनी त्यास तुला दिलेले काम करून घे, असे सांगितले. यावरून रा. आल्याने तुषार चव्हाण व इतरांनी मिळून नाईक यांना मारहाण केली. तुषार याने त्याच्याकडील कोयता नाईक यांच्या डोक्यात मारला. इतरांनी लाकडी स्टंप व बांबूने नाईक यांना मारहाण केली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव अधिक तपास करीत आहेत.