शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडणी सुरु असताना कामगाराला सर्पदंश झाला, विष उतरवण्यासाठी मांत्रिक बोलावला; अन्...     

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 19:34 IST

रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात मांत्रिकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : वाघाळे ( ता. शिरूर ) येथे शेतात ऊसतोड  सुरु असताना एका कामगाराला सर्पदंश झाला. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली. मात्र सर्पदंश झालेल्या कामगारावर रुग्णालयात सुरू असलेले उपचार बंद करत मांत्रिकांमार्फत मंत्र व लिंबांचा वापर करत अघोरी विद्येचा प्रयोग करण्यात येत होता. मात्र हा जीवावर बेतणारा प्रकार अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उधळून लावला. व त्या कामगाराला पुन्हा एकदा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात या मांत्रिकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात असून त्याला अटक देखील केली आहे. 

पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यातील वाघाळे येथे ऊसतोड करत असताना अंकुश वाघ यांना विषारी सापाने दंश केला. त्यावेळी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र याचदरम्यान अंकुश यांच्यावरील सुरू असलेले उपचार बंद करून मांत्रिकाच्या माध्यमातून विष उतरविण्यासाठी नातेवाईकांनी मांत्रिक जयवंत शिंदे (वय 78) याच्याकडे नेण्यात आले. यावेळी या मांत्रिकाने सर्पदंश झालेल्या कामगाराचे डोक्याचे केस ओढत त्याच्यावर मंत्र म्हणत लिंबांचे पूजन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी मांत्रिकाचा कामगारावर सुरु असलेला जादूटोण्याचा जीवघेणा प्रयोग हाणून पाडला. तसेच अघोरी विद्येचे प्रयोग करणाऱ्या मांत्रिकाला पोलिसांच्या स्वाधीन केले. मांत्रिक जयवंत शिंदे याच्यावर जादूटोणा प्रतिबंध उच्चाटन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव म्हणाल्या, मांत्रिकाच्या सहाय्याने अंधश्रद्धेपोटी मंत्र, तंत्र, गंडे, दोऱ्याचा वापर करत नागरिकांची फसवणूक केली जात आहे. मात्र अशा प्रकारे अघोरी उपचार करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करताना जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे. 

.

टॅग्स :Shirurशिरुरsnakeसापhospitalहॉस्पिटलMaharashtra Andhashraddha Nirmulan Samitiमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीPoliceपोलिस