शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गंज पेठेत लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेली व्यक्ती कोरोना पॅाझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 14:06 IST

फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांमधे पसरली घबराट पसरली, शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज

ठळक मुद्देअग्निशमन दलाकडून ५ ते १० मिनिटात ही आग आटोक्यात

पुण्यातल्या गंज पेठेत काल रात्री एका गोडाउन मध्ये आग लागुन एका माणसाचा मृत्यू झाला. त्यामध्ये मृत्युमुखी पडलेली व्यक्ती ही कोरोना पॅाझिटिव्ह असल्याचे आढळल्याने आता फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांमधे घबराट पसरली आहे.  

पुण्यात काल मध्यराञी गंज पेठ, मासेआळी येथे भंगार माल असणारया दुकानात लागलेल्या आगीमधे एक इसम भाजल्याने गंभीर जखमी झाला होता. अग्निशमन विभागाने या ठिकाणी १० फायरमन पाठवले. तसेच एक टॅंकर पाठवून आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आल्या नंतर जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या व्यक्तीचा मृत्यू झाला.  यावेळी या व्यक्तीची कोरोना चाचणी केल्यानंतर पॅाझिटिव्ह असल्याचे आढळले.  यामुळे आता या ठिकाणी हजर असलेल्या फायरमनच्या काळजीत वाढ झाली आहे. शिवकांत कुमार (वय 28, रा. मूळ. उत्तरप्रदेश, सध्या, मासेआळी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. 

महात्मा फुले गंज पेठ येथील मासेआळी कॉर्नर जवळ “आर. के. स्क्रॅप सेंटर आहे. हे स्क्रॅप सेंटर रोहित वासुदेव कुदाराम यांचे आहे. पुढच्या बाजूला छोटे दुकान आहे. तर पाठीमागे ४०० स्केअरफूटमध्ये गोडाऊन आहे. येथे शिवकांत हा काम करत होता.  प्लास्टिक आणि तेलाचे डब्बे विकत घेण्याचे काम केले जात होते. दरम्यान, गुरुवारी रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास अचानक नागरिकांना कामगाराचा ओरडण्याचा आवाज आला. तो ओरडला त्यावेळी आग नव्हती, असे नागरिकांनी अग्निशमन दलाला सांगितले. पण नंतर काही वेळातच आग लागल्याचे दिसून आले. मग त्यांनी अग्निशमन दलाला ही माहिती दिली. त्यानंतर मध्यवर्ती अग्निशमन दलाचे जवान फायर बंब घेऊन दाखल झाले. ५ ते १० मिनिटात ही आग आटोक्यात आणली. पण आत जाऊन पाहिल्यानंतर एक कामगार आगीत होरपळल्याचे दिसून आले. त्याला तात्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले  होते. मात्र त्याचा मृत्यू झाला.  अग्निशमन दलाचे अधिकारी प्रकाश गोरे, जवान राहुल नलावडे, सपकाळ, देवकुळे, देवदूतचे शिर्के, कार्ले या जवान यांनी ही आग आटोक्यात आणत कामगिरी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसWaterपाणी