वाघोलीमध्ये वाहतूक विभागाचे काम प्रगतिपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:10 IST2021-03-28T04:10:43+5:302021-03-28T04:10:43+5:30
चौकीशेजारी व चौकीत अनधिकृत पार्किंगचे अतिक्रमणे दूर करत परिसर स्वच्छ केला, तर वाहतूक शाखेसाठी एक नवीन कंटेनर ऑफिस ...

वाघोलीमध्ये वाहतूक विभागाचे काम प्रगतिपथावर
चौकीशेजारी व चौकीत अनधिकृत पार्किंगचे अतिक्रमणे दूर करत परिसर स्वच्छ केला, तर वाहतूक शाखेसाठी एक नवीन कंटेनर ऑफिस व पोलीस चौकीच्या ऑफिसला ठेवला आहे. परिसरात मशिनच्या साह्याने सपाटीकरण करण्यात आले.साफसफाई करून लवकरच या ठिकाणावर वाहतूक शाखेचा कारभार सुरळीत चालणार आहे. त्यामुळे वाघोली परिसरातील नित्याची होणारी वाहतूक कोंडीसह वाहतूकीच्या समस्या दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. यावेळी वाहतुक शाखा झोन चार चे सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्जेराव बाबर ,पोलिस निरिक्षक बाजीराव मोळे,सचिन वाघोदे,गणेश मरकड, समाधान जाधव हे उपस्थित होते तर डेक्कन चेंबर आॕफ काॕमर्स चेअरमन प्रकाश ढोका , व्हाइस चेअरमन एच.पी. श्रीवास्तवा यांच्या सौजन्याने हे काम करण्यात येत आहे.