शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

केवळ जयघोष आणि धांगडधिंगाण्यापेक्षा शिवरायांच्या विचारधारेवर काम व्हावे : रायबा मालुसरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 18:26 IST

शिवरायांसह त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या शिलेदारांचे कार्य व खरा इतिहास माहिती होणे आवश्यक

ठळक मुद्देसध्या पिंपरी येथील आयबीएम महाविद्यालयात घेत आहेत एमबीएचे शिक्षण

पुणे - "छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य निर्मितीचे कार्य जगासाठी भूषणावह आहे.शिवरायांसह त्यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याच्या लढलेल्या शिलेदारांचे कार्य व खरा इतिहास नव्या पिढीसोबतच सर्वांनाच माहिती होणे आवश्यक आहे. त्यांच्या कायार्चा आदर्श घेऊन काम केल्यास खर्या अथार्ने शिवरायांना अभिवादन ठरेल," असे मत तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज रायबा मालुसरे यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विश्रांतवाडी परिसरातील विविध मंडळाच्या कार्यक्रमात त्यांनी भेटी दिल्या. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलिस निरीक्षक रविंद्र कदम, रायबाचे सहकारी हर्षवर्धन घोरपडे, सिद्धार्थ जाधव उपस्थित होते.

रायबा मालुसरे म्हणाले , छत्रपती शिवरायांसह सर्वच महापुरुषांच्या आदर्श जीवनकायार्चा नव्या पिढीसह सर्वांनीच अभ्यास करणे आवश्यक आहे. केवळ जयघोष आणि धांगडधिग्यापेक्षा त्यांच्या विचारधारेवर काम होणे आवश्यक आहे. या निमित्ताने रायबा मालुसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची महत्त्वपूर्ण आठवण कथन केली. कोंढाणा किल्ल्यावर तानाजी मालुसरे लढाईत धारातीर्थी पडल्यानंतर त्यांचा देह राजगड येथे आणण्यात आला. या ठिकाणी छत्रपतींनी स्वत:च्या गळ्यातील "राजमाळ" तानाजींच्या पार्थिवावर अर्पण केली. ती "राजमाळ"  आजही मालुसरे कुटुंबाकडे सन्मानपूर्वक जतन करून ठेवण्यात आली आहे. यावेळी रायबा मालुसरे यांनी त्यांच्या कुटुंबीयांबद्दल माहिती दिली. त्यांच्या आई डॉ. शितल मालुसरे यांनी "नरवीर तानाजी मालुसरे व शिवशाही "या विषयावर पीएचडी मिळवली असून रायबा यांनी मुंबई विद्यापीठातून संगणक अभियंता पदवी मिळवली आहे.सध्या पिंपरी येथील आयबीएम महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत आहेत.

चंदगड येथील पारगड किल्ला येथे तानाजी यांचे पुत्र रायबा यांची समाधी असून मालुसरे कुटुंबीयांच्या वतीने होळी, माघ पौर्णिमा, दीपोत्सव असे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यावेळी पोलिस निरीक्षक रविंद्र कदम, रायबाचे सहकारी हर्षवर्धन घोरपडे, सिद्धार्थ जाधव उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेShivjayantiशिवजयंतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज