रोटरी क्लबचे कार्य कौतुकास्पद : माउली खंडागळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:08 IST2021-07-02T04:08:33+5:302021-07-02T04:08:33+5:30

जुन्नर तालुक्यात शिष्यवृत्तीमध्ये सर्वाधिक विद्यार्थी आणणारी व नवोदयमध्ये तालुक्यात एकमेव विद्यार्थी आलेली आदर्श शाळा मांजरवाडी विविध उपक्रम राबविण्यात ...

The work of the Rotary Club is commendable: Mauli Khandagale | रोटरी क्लबचे कार्य कौतुकास्पद : माउली खंडागळे

रोटरी क्लबचे कार्य कौतुकास्पद : माउली खंडागळे

जुन्नर तालुक्यात शिष्यवृत्तीमध्ये सर्वाधिक विद्यार्थी आणणारी व नवोदयमध्ये तालुक्यात एकमेव विद्यार्थी आलेली आदर्श शाळा मांजरवाडी विविध उपक्रम राबविण्यात तालुक्यात अग्रक्रमावर आहे. उपक्रम राबविणारे या शाळेतील अष्टपैलू शिक्षक संजय रणदिवे यांच्या कामगिरीबद्दल त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने रोटरीचे अध्यक्ष अंबादास वामन यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी डॉ. पंजाब कथे, सरपंच मनीषा मुळे, उपसरपंच संतोष मोरे, सचिव श्रीकांत फुलसुंदर, बाळासाहेब गिलबिले, रवींद्र वाजगे, सुकाजी मुळे साहेब, व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय खंडागळे, उपाध्यक्ष सुषमा मुळे, ग्रामपंचायत सदस्य दत्ता गायकवाड, रमेश मुळे, मुख्याध्यापक यशवंत गवारी उपस्थित होते. रोटरी क्लब नारायणगाव हायवे यांच्यावतीने हँड वॉश स्टेशन शाळेला देण्यात आला.

०१ खोडद

मांजरवाडी शाळेतील आदर्श शिक्षक संजय रणदिवे यांचा सत्कार करताना अध्यक्ष अंबादास वामन व इतर मान्यवर.

Web Title: The work of the Rotary Club is commendable: Mauli Khandagale