शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

पुरंदर विमानतळाच्या कामाला आता अधिक गती मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 20:37 IST

भूसंपादन करताना येणाऱ्या अडचणी, नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुणे जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालयाची आवश्यकता

ठळक मुद्देविमानतळाच्या कामासाठी एमएडीसीचे पुण्यात अधिकृत कार्यालय सुरुपुण्यात शिवाजीनगर येथील संचेती रुग्णालयासमोरील कुबेरा चेंबर या इमारतीत सुरु

पुणे : गेल्या तीन-चार वर्षांपासून कासव गतीने सुरु असलेल्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला आता अधिक गती मिळणार आहे. विमानतळाचे काम जलद गतीने व्हावे व विमानतळ नगारिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी)चे अधिकृत कार्यालय पुण्यात शिवाजीनगर येथील संचेती रुग्णालयासमोरील कुबेरा चेंबर या इमारतीत सुरु झाले आहे. या कार्यालयाचे समन्वय अधिकारी म्हणून दीपक नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.     राज्य शासनाने पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला मान्यता देऊन चार वर्षांचा कालावधी लोटला आहे. परंतु अद्याप विमानतळाच्या कामाला अपेक्षित गती मात्र मिळालेली नाही. विमानतळासाठी आवश्यक जागेसाठी अद्यापही भूसंपादन सुरु झालेले नाही. विमानतळासाठी पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी अशा सात गावांमधील दोन हजार ८३२ हेक्टर जमीन संपादिक केली जाणार आहे. यात पारगाव येथील १ हजार ३७ हेक्टर, खानवडीमधील ४८४ हेक्टर, मुंजवडी गावातील १४२ हेक्टर, एखतपूर येथील २१७ हेक्टर, कुंभारवळणमधील ३५१ हेक्टर, वनपुरीतील ३३९ हेक्टर आणि उदाचीवाडी येथील २६१ हेक्टर क्षेत्रफळाचे भूंसपादन करण्यात येणार आहे. या भूसंपदानासाठी प्रत्येक गावासाठी स्वतंत्र उपजिल्हाधिका-यांची नियुक्ती करण्यात आल्या आहेत.     राज्य शासनाने विमानतळाच्या जागेच्या भूसंपादनासाठी तीन हजार ५१३ कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. विमानतळ उभारणीसाठी सिडकोचे ५१ टक्के, एमएडीसीचे १९ टक्के, एमआयडीसी आणि पीएमआरडीएचे प्रत्येकी १५ टक्के समभाग असणार आहेत. यामुळे भूसंपादन करताना व इतर सर्व प्रकल्प पुढे घेऊन जाताना या सर्व विभागांशी समन्वय साधण्याची गरज आहे. तसेच भूसंपादन करताना येणाऱ्या अडचणी, नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुणे जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालयाची आवश्यकता होती. अखेर एमएडीसी पुण्यात स्वतंत्र कार्यालय सुरु केले असून, आता विमानतळाच्या कामाला अधिक गती मिळण्यास मदत होणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेAirportविमानतळPurandarपुरंदरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाGovernmentसरकार