वरंध घाटातील संरक्षक भिंतीचे काम अपूर्ण, भोर-महाड रस्ता सुरू होण्यास अजून १५ दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:09 IST2021-05-11T04:09:41+5:302021-05-11T04:09:41+5:30

घाटातील महाड तालुक्याच्या हद्दीतील एका तीव्र वळणावरील संरक्षक भिंत १२ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे कोसळली होती. यामुळे मागील सहा ...

Work on the protective wall in Warandh Ghat is incomplete, Bhor-Mahad road has another 15 days to start | वरंध घाटातील संरक्षक भिंतीचे काम अपूर्ण, भोर-महाड रस्ता सुरू होण्यास अजून १५ दिवस

वरंध घाटातील संरक्षक भिंतीचे काम अपूर्ण, भोर-महाड रस्ता सुरू होण्यास अजून १५ दिवस

घाटातील महाड तालुक्याच्या हद्दीतील एका तीव्र वळणावरील संरक्षक भिंत १२ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे कोसळली होती. यामुळे मागील सहा महिन्यांपासून वाहतूक बंद होती. सदरच्या दुरुस्तीच्या कामासाठी ५ कोटी ४० लाख ५५ हजार रु. निधी सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांच्याकडे मंजूर करण्यात आला होता. १० फेब्रुवारीपासून भिंतीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, सदरचे काम ८० दिवसांत ३० एप्रिल पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्यामुळे महाड बांधकाम विभागाकडून भोर-महाड रस्त्यावरील वाहतूक बंद केली होती.

दरम्यान, महाड बांधकाम विभागाकडून दिलेली ३० एप्रिलची मुदत संपून १० दिवस झाले, तरीदेखील अद्याप काम पूर्ण झाले नसून पुढील दहा ते पंधरा दिवस काम पूर्ण होण्यासाठी लागणार आहेत. त्यानंतर रस्ता वाहतुकीस सुरू होणार असल्याचे महाड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

मागील ९ महिने रस्त्यावरील वाहतूक बंद

१२ आँगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे भोर-महाड रस्ता बंद आहे. तर दुरुस्तीचे काम ८० दिवसांत होणार होती. कामाची मुदत संपली तरीही अजून १० ते १५ दिवस रस्ता सुरू होणार नाही. यामुळे सदर रस्त्यावरील अनेक उद्योग व्यवसाय बंद असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे प्रवासी नागरिक नाराजी व्यक्त करीत असून रस्ता वाहतुकीस खूला करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Work on the protective wall in Warandh Ghat is incomplete, Bhor-Mahad road has another 15 days to start