शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 01:10 IST

मध्य रेल्वेची अप लाईन मध्यरात्री सुरू : मिडल लाइन दिवसभर बंद

लोणावळा : पुणे-मुंबई लोहमार्गावर शनिवारी रात्री १०.५० वाजण्याच्या सुमारास खंडाळा घाटात अप व मिडल लाइनवर दरड कोसळली. रेल्वे वाहतूक मध्यरात्रीपर्यंत ठप्प होती. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अप लाइनवरील दगड बाजूला करत मुंबई व पुणे या दुतर्फा जाणारी वाहतूक धिम्म्या गतीने सुरू करण्यात आली. दरम्यान, मिडल लाइन ही शनिवारी रात्रभर व रविवारी दिवसभर बंद ठेवत डोंगरावरील सैल झालेले दगड काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले होते.

लोणावळा व खंडाळा परिसरात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर असल्याने डोंगरभागातील सैल झालेले दगड शुक्रवारी व शनिवारी लोहमार्गावर पडण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यामध्ये जीवित वा वित्तहानी झाली नाही.शनिवारी रात्री अप व मिडल या दोन्ही लाइनवर मोठमोठे दगड व माती डोंगरावरून खाली आल्याने मुंबई व पुणे या दोन्ही बाजूंकडे जाणारी वाहतूक ठप्प होती. यामुळे कोल्हापूर-अहमदाबाद ही रेल्वे खंडाळा स्थानकावर, तर सिद्धेश्वर एक्सप्रेस ही गाडी सीएसटी स्थानकावर थांबविण्यात आली होती. लोणावळा व कल्याण येथील आपत्कालीन पथकाने रात्री तातडीने अप लाइनवरील दगड बाजूला करीत मध्यरात्री साडेबाराला ही लाइन सुरु केली. तद्नंतर रेल्वे वाहतूक काही मिनिटे उशिराने सुरु झाली. दिवसभर या भागात धिम्म्या गतीने रेल्वे वाहतूक सुरु होती. रात्री हवा, पाऊस व अंधारामुळे कामात अडथळा येत होता.दिवस उजाडल्यानंतर खंडाळा घाटातील दरडप्रवण भागाची पाहणी करत डोंगरातील सैल झालेले दगड, तसेच मोठे दगड फोडून बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते, याकरिता मिडल लाइन दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. मागील वर्षीदेखील मंकी हिल भागात दरड पडल्याच्या घटना घडल्या होत्या. खंडाळा घाटात लोहमार्गावर वारंवार दरड पडण्याच्या घटना घडू लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे प्रशासनाने या घटना रोखण्याकरिता उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वे