शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

पुण्यातील एक हजार गावात वीज अटकाव यंत्रणा बसवण्याचे काम सुरु; मात्र ग्रामस्थांना काही माहीतच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 11:07 IST

जिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन,  सार्वजनिक बांधकाम मात्र अंधारात

ठळक मुद्देवीज अटकाव यंत्रणा बसवल्याचे स्थानिकांना माहीतच नाही

पुणे : पुणे जिल्ह्यासह गडचिरोली आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात येत आहे. यासाठी थेट मंत्रालयातून तब्बल ५८ कोटींची टेंडर प्रक्रीया राबविण्यात आली व ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली. या अंतर्गत पुणे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ८५५ व नंतर २०० गावांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. परंतु याबाबत पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती गावांत ही यंत्रणा बसविण्यात येणार,  आता पर्यंत कुठे बसविण्यात आली, कामाची प्रगती या संदर्भात ना जिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किंवा पुणे बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता यांना काहीच माहिती नाही. जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये ही वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात येत असताना जिल्हास्तरावरील सर्वच यंत्रणांना मात्र अंधारात ठेवण्यात आले आहे. 

दर वर्षी मान्सूनपूर्व पावसात जिल्ह्यात वीज पडण्याच्या अनेक घटना घडतात. यात पुणे जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत ७ लोकांचा वीज पडून मृत्यु झाला. तर काही ठिकाणी मोठी वित्त हानी देखील झाली आहे. या पार्श्वभूमीवरच राज्य शासनाने प्रायोगिक तत्त्वावर पुणे, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यात वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात येत आहे. यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शंभर टक्के गावे आणि पुणे जिल्ह्यातील ८५५ गावांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यासाठी तब्बल ५८ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. 

वीज अटकाव यंत्रणा बसवल्याचे स्थानिकांना माहीतच नाही 

एका गावात हे यंत्र बसविण्यासाठी सरासरी दोन लाखांपेक्षा अधिक खर्च येतो. जिल्ह्यात आता पर्यंत ६६८ गावांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात देखील आली असल्याचे मंत्रालयातून सांगण्यात आले. परंतु पुणे जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाला मात्र याची कल्पना देखील नाही. खरच या गावांमध्ये ही यंत्रणा बसली आहे का, यंत्रणा बसविल्यानंतर देखभाल दुरूस्तीचे काय, यंत्रणा चालु किंवा बंद कसे कळणार, काही अडचण आल्यास स्थानिक प्रशासनाला कुणाकडे संपर्क करायचा याबाबत कोणत्याही प्रकारची स्पष्टता नाही. स्थानिक प्रशासनाकडे चौकशी केली असता काही माहिती नसल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील काही गावांमध्ये चौकशी केली असता त्यांना देखील आपल्या गावांत अशी काही यंत्रणा बसविण्यात आल्याचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांना कल्पना नाही. कोट्यवधी खर्च करून बसविण्यात येत असलेल्या वीज अटकाव यंत्रणेच्या मुंबई कनेक्शनमुळे स्थानिक मात्र सर्वच अंधारात आहेत. 

नियोजन व नियंत्रण मंत्रालयातूनच 

जिल्ह्यातील लोकांच्या फायद्यासाठी, सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन बसविण्यात येत असलेल्या वीज अटकाव यंत्रणेचे नियोजन आणि नियंत्रण पूर्णपणे मंत्रालयातून करण्यात येत आहे. यासाठी सेंटर पध्दतीने टेंडर देण्यात आले आहे. देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पाच वर्षांसाठी संबंधित ठेकेदारांची आहे. पण यंत्रणा चालु किंवा बंद पडली याची मंत्रालयातून कधी तरी रँडमली तपासणी करण्यात येणार असल्याचे मंत्रालयातील बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पाटील यांनी सांगीतले. यंत्रणा चोरीला गेली, बंद पडली, गावाला काही अडचण आली तर कुणाला संपर्क करायचा यांचे कोणतेही उत्तर याचे काम पाहणारे अधीक्षक अभियंता पाटील यांना देता आले नाही.

टॅग्स :PuneपुणेelectricityवीजGovernmentसरकारcollectorजिल्हाधिकारीRural Developmentग्रामीण विकास