करंदीत दारूअड्ड्यावर महिलांची धाड

By Admin | Updated: March 31, 2017 02:25 IST2017-03-31T02:25:53+5:302017-03-31T02:25:53+5:30

करंदी येथील साईमुद्रा हॉटेलच्या मागे सुरू असलेला दारू अड्डा महिला मुक्ती मोर्चाच्या महिलांनी उद्ध्वस्त केला

Women's raid on liquor barracks | करंदीत दारूअड्ड्यावर महिलांची धाड

करंदीत दारूअड्ड्यावर महिलांची धाड

केंंदूर : करंदी येथील साईमुद्रा हॉटेलच्या मागे सुरू असलेला दारू अड्डा महिला मुक्ती मोर्चाच्या महिलांनी उद्ध्वस्त केला. या ठिकाणी अवैधरीत्या दारू व्यवसाय सुरू असल्याची माहिती संबंधित महिलांना मिळालेली होती. या दारू व्यवसायामुळे परिसरातील सर्वसामान्य महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. या वेळी महिला मुक्ती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा प्रीती चव्हाण, सचिव राजश्री पवार, कार्याध्यक्ष सचिन मांडे, सदस्य महेश पवार यांनी संबंधित जागेवर अचानक धाड टाकून. शिक्रापूर पोलिसांना खबर देण्यात आली. त्यानुसार त्या ठिकाणाहून दारूचे कॅन, कळशी जप्त करण्यात आलेले आहे. पुढील कायदेशीर कारवाई शिक्रापूर पोलीस करीत आहेत.

Web Title: Women's raid on liquor barracks