महिला पोलिसाची आत्महत्या

By Admin | Updated: July 18, 2014 03:43 IST2014-07-18T03:27:06+5:302014-07-18T03:43:06+5:30

इच्छेविरुद्ध लग्न झाले या कारणावरून महिला पोलिसाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी फुरसुंगीमध्ये घडली.

Women's Policemen Suicide | महिला पोलिसाची आत्महत्या

महिला पोलिसाची आत्महत्या

पुणे : इच्छेविरुद्ध लग्न झाले या कारणावरून महिला पोलिसाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी फुरसुंगीमध्ये घडली. ही कर्मचारी हडपसर पोलीस ठाण्यात नेमणुकीस होती.
मेघा अनिल कांबळे (वय २४, रा. फुरसुंगी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. एन. मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघा ही मूळची सोलापूरची रहिवासी असून, ती २00९ मध्ये शहर पोलीस दलामध्ये नोकरीला लागली होती. सध्या ती हडपसर पोलीस ठाण्यात नेमणुकीस होती. तिचे ७ जुलै रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्गमध्ये लग्न झाले होते. हे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तिचा नवरा एका कॉल सेंटरमध्ये काम करतो. फुरसुंगी येथे हे दोघेच राहत होते. काही दिवसांपूर्वी कांबळे हिची आईदेखील त्यांच्या घरी आलेली होती. गुरुवारी मेघा हिने घरातील पंख्याला चादरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.(प्रतिनिधी)०

Web Title: Women's Policemen Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.