शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 18:56 IST

गुन्ह्याची निर्गती ६० दिवसात होणे अपेक्षित असताना गुन्ह्याचे दोषारोपपत्र विहीत मुदतीत न्यायालयात सादर करण्यात आले नसल्याची गंभीर बाब निदर्शनास येत आहे

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात हगवणे यांची मोठी सून मयुरी जगताप हिने हगवणे कुटुंबियांवर आरोप केले आहेत. वैष्णवीप्रमाणे हगवणे कुटुंबातील सासरे, नणंद, सासू, दीर यांनी माझ्यावर सुद्धा अत्याचार केले. त्यांनी मारहाणही केली असल्याचे मयुरी यांनी सांगितले आहे. या प्रकरणात मयुरीने महिला आयोगाकडे तक्रार केल्याचे सांगितले होते. 

मयुरीच्या आई आणि भावाने हा तक्रार अर्ज महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नावाने आयोगाकडे दिला होता. अर्जाची चाकणकर यांनी दखल न घेतल्याचे मयुरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यानंतर चाकणकर यांनी आयोगाने तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्वरित दखल घेऊन  पौंड पोलीसांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असल्याचे चाकणकर यांनी सांगितले होते. आता त्यांनी या प्रकरणाबाबत पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी अशी विनंती आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.  

आयोगाने तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्वरित दखल घेऊन त्यांनी पौड पोलीसांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. आयोगाच्या सूचनेनुसार पौड पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांकडून झालेल्या दिरंगाईबाबत आयोगाने अहवाल मागविला होता. आज दि.२८.०५.२०२५ रोजी पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण यांच्याकडून अहवाल प्राप्त झाला. अहवालात नमूद तपासाचा आढावा घेतल्यावर पोलिसांनी गुन्ह्याचे दोषारोपपत्र विहीत मुदतीत मा. न्यायालयात सादर करण्यात आले नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे. दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची गृह विभागामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी विनंती आयोगाने मुख्यमंत्र्यांना केली आहे. 

पत्रात नेमकं काय नमूद केलंय?  

प्रति, श्री. देवेंद्र फडणवीसजी मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र.

विषय :- सौ. मयुरी जगताप-हगवणे यांच्याशी संबंधित गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या दिरंगाईची चौकशी करणेबाबत...

मा. महोदय,

पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेचा सासरकडून हुंड्यासाठी छळ होऊन मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र अस्वस्थ आहे. वैष्णवी आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. हे आपण राज्याचे प्रमुख म्हणून स्पष्ट केले आहेच. वैष्णवीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर हगवणे कुटुंबियांच्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या असून मोठी सून सौ. मयुरी जगताप-हगवणे हिला होणाऱ्या त्रासासंबंधी राज्य महिला आयोगाकडे मयुरीचा भाऊ श्री. मेघराज जगताप आणि आई श्रीमती लता जगताप यांनी दि.०६.११.२०२४ रोजी तक्रार केली होती. आयोगाने तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्वरित दखल घेऊन दि.०७.११.२०२४ रोजी पौंड पोलीसांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. आयोगाच्या सूचनेनुसार पौड पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. तदनंतर या प्रकरणी पोलिसांकडून झालेल्या दिरंगाईबाबत आयोगाने अहवाल मागविला होता. आज दि.२८.०५.२०२५ रोजी पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण यांच्याकडून अहवाल प्राप्त झाला आहे. अहवालात नमूद तपासाचा आढावा घेतले असता आवश्यक पोलीस तपासानंतर सदर प्रकरण महिला अत्याचारासंबंधीचे असल्याने गुन्ह्याची निर्गती ६० दिवसात होणे अपेक्षित असताना गुन्ह्याचे दोषारोपपत्र विहीत मुदतीत मा. न्यायालयात सादर करण्यात आले नसल्याची गंभीर बाब निदर्शनास येत आहे. कौटुंबिक हिंसेच्या या प्रकरणात तक्रारदारास संवेदनशीलतेने आणि वेळेत सहाय्य मिळणे महत्त्वाचे होते. दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची गृह विभागामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी आपणास नम्र विनंती आहे.

टॅग्स :PuneपुणेRupali Chakankarरुपाली चाकणकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणChief Ministerमुख्यमंत्रीVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेHome Ministryगृह मंत्रालय