महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे : कानडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:12 IST2021-03-09T04:12:46+5:302021-03-09T04:12:46+5:30
जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा एकलहरे (ता. आंबेगाव) येथे जागतिक महिला दिनानिमित्त नवनिर्वाचित ग्रामपंचायत महिला पदाधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी ...

महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे : कानडे
जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा एकलहरे (ता. आंबेगाव) येथे जागतिक महिला दिनानिमित्त नवनिर्वाचित ग्रामपंचायत महिला पदाधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी ताई, आशा सेविका, महिला पालक यांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय भाषणात कानडे बोलत होत्या. यावेळी अंगणवाडी सेविका रंजना आग्रे यांनी 'सावित्रीची ओवी' सादर केली.
याप्रसंगी सरपंच राणी खैरे, सदस्या रीना डोके, विमल शिंदे, प्रीती डोके, योगिता शिंदे, शीला लोंढे, ग्रामसेविका श्यामल डोंगरे, शीतल सोमवंशी, सुलोचना देठे, भारती कदम, सुवर्णा पंधारे, सुप्रिया शिंदे यांचा शाल व पुस्तक देवून सन्मान करण्यात आला.
यानिमित्ताने शालेय स्वच्छतादूत अजिजा इनामदार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच अंगणवाडी केंद्र शिंदेवाडी,लोंढेमळा व एकलहरे गावठाण यांना प्रथमोपचार साहित्य व स्वच्छता किट ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठान,कळंबच्या वतीने भेट देण्यात आले.
यावेळी उपसरपंच दिपक डोके,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडुरंग डोके,ग्रामपंचायत सदस्य प्रदीप शिंदे,सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंत डोके यांनी आपली मनोगते व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य सुशिल देठे,महेंद्र डोके,नितीन डोके,राहुल डोके उपस्थित होते. प्रास्ताविक प्रदीप चासकर,सूत्रसंचालन संतोष थोरात व आभार ग्रामसेविका श्यामल डोंगरे यांनी मानले.
०८मंचर एकलहरे
राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमापूजन करताना महिला.