महिलांनी काळानुसार अर्थसाक्षार होणे गरजेचे: अंकिता शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:12 IST2021-03-09T04:12:59+5:302021-03-09T04:12:59+5:30

जागतिक महिला दिनानिमित्त सोमवारी (दि. ८) इंदापूर नगरपरिषदेच्या कार्यालयात नगराध्यक्षा अंकिता शहा व नगरसेविका मीना ताहेर मोमीन यांच्या हस्ते ...

Women need to be literate in time: Ankita Shah | महिलांनी काळानुसार अर्थसाक्षार होणे गरजेचे: अंकिता शहा

महिलांनी काळानुसार अर्थसाक्षार होणे गरजेचे: अंकिता शहा

जागतिक महिला दिनानिमित्त सोमवारी (दि. ८) इंदापूर नगरपरिषदेच्या कार्यालयात नगराध्यक्षा अंकिता शहा व नगरसेविका मीना ताहेर मोमीन यांच्या हस्ते देशातील विविध महामातांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी नगरपरिषदेतील महिला अधिकारी व कर्मचारी यांना गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा यांनीही महिलांना शुभेच्छा दिल्या.

अंकिता शहा म्हणाल्या की, इंदापूर नगरपरिषदेमार्फत शहारातील विविध बचत गटांना व त्यातील होतकरू महिलांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून आपण शेकडो महिलांना अनुदान वाटप केले आहे. कुटुंबातील महिला कमावत्या झाल्या तर कुटुंबाचा गाडा पुढे जाण्यास मदत होते. व्यावसायिक क्षेत्रात महिलांना अनेक संधी उपलब्ध झाले असून, बेरोजगार महिलांनी आता एक पाऊल पुढे येण्याची गरज आहे.

इंदापूर येथे महिलांचा सन्मान करताना नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा व मान्यवर.

०८ इंदापूर नगरपालिका

Web Title: Women need to be literate in time: Ankita Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.