शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
4
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
5
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
6
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
7
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
8
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
9
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
10
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
11
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल

By admin | Published: March 20, 2017 4:50 AM

‘अस्तित्व - तीच्या नजरेतून’ ही संकल्पनाच क्रांतिकारी आहे. महिला सक्षमीकरणाच्या चळवळीने शतकाहून अधिक टप्पा ओलांडला आहे.

‘अस्तित्व - तीच्या नजरेतून’ ही संकल्पनाच क्रांतिकारी आहे. महिला सक्षमीकरणाच्या चळवळीने शतकाहून अधिक टप्पा ओलांडला आहे. आज या टप्प्यावर महिलांनी आपल्या नजरेतून या चळवळीकडे पाहण्याची गरज आहे. ‘ती’चे अस्तित्व तिच्या नजरेतून पाहणे आवश्यक होते. त्यामुळे पुढील मार्गावर आणखी बळकटपणे पुढे जाण्यासाठी दिशा आणि धोरण ठरविणे शक्य होते. लोकमत वुमेन समिट गेल्या सहा वर्षांपासून याच भूमिकेतून काम करीत आहे. आजचा क्षण हा माझ्यासाठी अभिमानाचा आणि आठवणींचा आहे, कारण अगदी पहिल्या पर्वापासूनची मी या समिटची साक्षीदार राहिली आहे. दर वर्षी ही समिट एक वेगळी उंची गाठते. महिलांचे प्रश्न, त्यांच्या समस्या यांवर चर्चा करतानाच त्यांच्या कर्तृत्वाचाही वेध घेतला जातो, हे या समिटचे वैशिष्ट्य आहे. स्त्री ही मुळातच सक्षम आहे. एक आई म्हणून, बहीण म्हणून किंवा एक बायको म्हणून ती नेहमीच सक्षम राहिली आहे. जग घडवण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे. पण दुर्दैवाने म्हणावे लागते, की कधी कधी स्त्रीच स्त्रीची शत्रू होते. समाजामध्ये उंची गाठलेल्या महिला तळागाळातील महिलांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे स्वत: सक्षम होताना सबंध स्त्रीजातीचादेखील विचार तिला करता आला पाहिजे. लोकमत वुमेन समिटचा हाच संदेश आहे. महिलांचे प्रश्न केवळ राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर चर्चिले जाऊन उपयोगी नाहीत. त्याच्यावर वैश्विक पातळीवरच उत्तरे शोधली पाहिजेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर या प्रश्नांना भिडण्याची गरज होती. त्यासाठी व्यासपीठ तयार होण्याची गरज निर्माण होती. ती लोकमत वुमेन समिटच्यानिमित्ताने पूर्ण झाली आहे. युनायटेड नेशन्स आणि युनिसेफ आज या समिटशी जोडले गेले आहे. पुण्यातून ही सुरुवात होत आहे, याचा आनंद आहे. महिलांच्या वेगवेगळ्या प्रश्नांबाबत सरकारी पातळीवर आणि सामाजिक स्तरावरदेखील गांभीर्याने घेतले जाते का? हे प्रश्नदेखील चर्चिले जाण्याची गरज आहे. २०११ वुमेन समिटच्या पहिल्या पर्वात ‘बेटी बचाव’ मोहिमेला सुरुवात करण्यात आली. स्त्री-भ्रूणहत्येविरुद्ध लढा देणाऱ्या ‘सेव्ह द गर्ल चाईल्ड’ या चळवळीला बळ देणे देण्यात आले, तर २०१२ च्या परिषदेत महिला सबलीकरणावर चर्चा करण्यात आली. २०१३ मध्ये त्यापुढे जाऊन ‘हिरकणी- असाध्य ते साध्य’ या विषयावर संवाद घडवून कर्तृत्ववान महिलांना सलाम करण्यात आला. महिलांच्या नेतृत्वावर चर्चा झाली. २०१४ च्या परिषदेत तर महिलांनी कवेत घेतलेले ‘सारे आकाश’ समोर आले. २०१५ च्या परिषदेची संकल्पना ‘परिर्वतन - नव्या युगाची महिला’ होत सामाजिक, आर्थिक, राजकीय पातळीवर झालेल्या परिवर्तनाचा शोध घेण्यात आला. यंदाच्या वर्षी ‘अस्तित्व - तीच्या नजरेतून’ या संकल्पनेवर चर्चा होणार आहे. महिला सक्षमीकरणाची चळवळ पुढे नेण्यास ही परिषद निश्चितच मैलाचा दगड ठरेल, असा मला विश्वास आहे.