शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

महिला, मुली असुरक्षित

By admin | Updated: April 8, 2015 03:51 IST

फेब्रुवारीमध्ये लोणावळ्यात एका विवाह सोहळ्याच्या दिवशी हॉटेलमध्ये सात वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून खुनाची घटना घडली

संजय माने, पिंपरीफेब्रुवारीमध्ये लोणावळ्यात एका विवाह सोहळ्याच्या दिवशी हॉटेलमध्ये सात वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून खुनाची घटना घडली. समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नागरिकांची आंदोलने झाली. पोलिसांनी आरोपींचा छडा लावला. या घटनेनंतर अशा कृत्यांवर नियंत्रण येईल, असे अपेक्षित होते. मात्र, त्यानंतर अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांचे सत्र मार्चअखेरपर्यंत सुरू राहिले. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाही अशा प्रकारची घटना घडली. चिंचवड, वाकड, पिंपरी, सांगवी आणि तळेगाव या ठिकाणी घडलेल्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेबरोबर महिलांची छेडछाड, विनयभंग शहराच्या विविध भागांत घडलेल्या या घटनांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. महिलांवर आणि विशेषत: अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना मनोविकृत मानले जात असले, तरी विनयभंग आणि बलात्काराच्या प्रकरणातील आरोपींमध्ये रखवालदार, घंटागाडी कर्मचारी ते हॉकीचा प्रशिक्षक अशा विविध स्तरातील व्यक्तींचा समावेश आहे. तर अत्याचाराच्या बळी ठरलेल्यांमध्ये चिमुरड्या बालिकेपासून ते गतिमंद मुलीचाही समावेश आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्कारातील बहुतांशी आरोपी हे अल्पवयीन आहेत. खेळण्या-बागडण्याच्या वयातील- १५ वर्षे वयोगटातील मुलांकडून बलात्कार, विनयभंग यांसारखे गंभीर गुन्हे घडतात, ही चिंतेची बाब ठरू लागली आहे. अत्याचार करून लोणावळ्यात चिमुरडीचा खून करण्यात आला. पाठोपाठ १९ मार्चला तळेगाव दाभाडे येथे १५ वर्षीय शाळकरी मुलीचा पाठलाग करून विनयभंग करण्याची घटना घडली. तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली. त्यांनतर २३ मार्चला निगडीत विनयभंगाच्या दोन घटना घडल्या. त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगी होती. २४ मार्चला वाकड येथे ८ वर्षांच्या बालिकेवर बलात्कार झाला. त्यातील आरोपी १५ वर्षांचा अल्पवयीन मुलगा होता. या घटना ताज्या असतानाच, २६ मार्चला १८ वर्षांच्या गतिमंद मुलीवर बलात्कार झाला. त्यातील आरोपीसुद्धा अल्पवयीन असल्याचे आढळून आले. ३० मार्चला चिंचवड येथील १४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांचे सत्र सुरूच असताना, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निराधारनगर येथील नऊ वर्षांच्या बालिकेला टीव्ही पाहण्यासाठी घरात बोलावून महापालिकेत घंटागाडी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या एका नराधमाने बलात्कार केला. याशिवाय महिलांच्या विनयभंग आणि बलात्काराच्या घटनांचीही विविध पोलीस ठाण्यांत नोंद झाली आहे.