शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

महिला तहसीलदारांची कारवाई : तीन ट्रक, १ क्रेन आणि बोटी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 20:58 IST

वाळू माफियांच्या ‘भाबड्या’ आशेवर पाणी पडले आहे. इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी रविवारी रात्री धाडसी कारवाई करून वाळू वाहतूक करणारे तीन हायवा, एक क्रेन आणि बोटींची वाहतूक करणारी गाडी जप्त केली आहे.

ठळक मुद्देबंद असणाऱ्या बोटींचे सर्व्हिसिंग करून तसेच दुरुस्ती करून रात्रीच्या वेळी वाळू उपसण्यास सुरुवात

भिगवण : महिला तहसीलदार असल्याने रात्री अपरात्री उजनी धरणक्षेत्रात येऊन कारवाई काय करणार नाहीत, या वाळू माफियांच्या ‘भाबड्या’ आशेवर पाणी पडले आहे. इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी रविवारी रात्री धाडसी कारवाई करून वाळू वाहतूक करणारे तीन हायवा, एक क्रेन आणि बोटींची वाहतूक करणारी गाडी जप्त केली आहे. इंदापूर तालुक्याच्या महिला तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी कारवाईचा धडाका देत कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी भूमिका घेऊन वाळू माफियांना मदत करणारे क्रेन व्यावसायिक तसेच शिफ्टिंग व्यावसायिक आणि दुरुस्ती करणारे फब्रिकेशन व्यवसाय यांच्या मालकावर कारवाई करणार आहे. याबाबत संबंधितांना नोटीस बजावण्यात आली असल्याचे तहसीलदार मेटकरी यांनी सांगितले.उजनी धरणातील वाळूउपसा काही दिवसांपूर्वी असणाऱ्या तहसीलदार पाटील यांच्या खमक्या कामगिरी मुळे बंद होता. मात्र, त्यांची बदली झाल्याने वाळू माफियांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली होती. बंद असणाऱ्या बोटींचे सर्व्हिसिंग करून तसेच दुरुस्ती करून रात्रीच्या वेळी वाळू उपसण्यास सुरुवात केली होती. गेले काही दिवस या उपशाची तहसीलदारांनी माहिती घेऊन कारवाईला सुरवात केली होती. मात्र, महसूल विभागातील काही कर्मचारी तसेच खबरी यंत्रणेकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याने काही वेळा कारवाईवर मर्यादा येत होत्या. त्यामुळे सापडलेल्या बोटी आणि फायबर पळवून नेण्यास मदत झाली होती. त्यामुळे तहसीलदार मेटकरी यांनी स्वत: लक्ष देत वाळू उपसा रोखण्यासाठी पथक तयार करून कारवाईला सुरुवात केली आहे. रविवारी (दि. ७) रात्री दोनच्या सुमारास उजनी परिसरात कारवाई केली. तीन वाळू वाहतूक करणारे डंपर, क्रेन आणि शिफ्टींग करणारे वाहन जप्त करून भिगवणपोलिसांच्या ताब्यात दिले. 

टॅग्स :BhigwanभिगवणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsandवाळूcollectorजिल्हाधिकारी