महिलेची पर्स पळवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:11 IST2020-12-06T04:11:37+5:302020-12-06T04:11:37+5:30

दारू दुकानातील रोकड लुटली पुणे : दारु विक्री दुकानात शिरलेल्या चोरट्याने कर्मचार्याला धमकावून गल्ल्यातील १८ हजार रुपये लुटून नेले. ...

The woman's purse was snatched | महिलेची पर्स पळवली

महिलेची पर्स पळवली

दारू दुकानातील रोकड लुटली

पुणे : दारु विक्री दुकानात शिरलेल्या चोरट्याने कर्मचार्याला धमकावून गल्ल्यातील १८ हजार रुपये लुटून नेले. ही घटना बिबवेवाडी येथील अनिल देशी दारु दुकानात गुरुवारी रात्री सव्वानऊ वाजता घडली. याप्रकरणी अनिल सगर (वय २४, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. ते दुकानात असताना तीन चोरटे दुकानात आले. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून सर्वांना बाहेर काढले. काऊंटरवर जाऊन फिर्यादी यांना कोयता दाखवून गल्ल्यातील १७ हजार ८२० रुपये चोरुन नेले. सहाय्यक पोलीस निरीक्षक के. बी. पावसे तपास करत आहेत.

.............

क्लोन कार्डद्वारे १ लाखांची फसवणूक

पुणे : डेबीट कार्डची गोपनीय माहिती मिळवून सायबर चोरट्याने नाशिक येथील एटीएममधून १ लाख रुपये काढून तरुणाची फसवणूक केली. याप्रकरणी हडपसर येथील एका ३२ वर्षाच्या तरुणाने सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना ३० नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती व डेबीट कार्डची माहिती काढून क्लोन कार्ड बनवून नाशिक येथून ही रक्कम काढण्यात आली आहे.

Web Title: The woman's purse was snatched