आळेफाट्यात सापडला महिलेचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:19 IST2021-03-13T04:19:01+5:302021-03-13T04:19:01+5:30
याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आळे गावच्या (ता. जुन्नर) येथील अहमदनगर रस्त्यावरील भुजबळ पेट्रोल पंपाच्या बाजुला आज ...

आळेफाट्यात सापडला महिलेचा मृतदेह
याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आळे गावच्या (ता. जुन्नर) येथील अहमदनगर रस्त्यावरील भुजबळ पेट्रोल पंपाच्या बाजुला आज सकाळी स्थानिक ग्रामस्थांना एक महिलेचा (वय अंदाजे ५५ ते ६०) मृतदेह आढळून आला त्यांनी तातडीने ही माहिती पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मात्र महिलेची ओळख पटली नाही. संबंधीत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. दोनच दिवसांपूर्वी आळेफाटा या ठिकाणी एका इसमाच्या डोक्यात सिमेंट दगड टाकून खून केला होता, ही घटना ताजी असतानाच आज परत महिलेचा मृतदेह सापडल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा पुढील तपास आळेफाटा पोलीस ठाण्यचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकास लोंढे हे करत आहेत.