चारित्र्याच्या संशयावरून महिलेचा खून

By Admin | Updated: January 11, 2017 02:51 IST2017-01-11T02:51:23+5:302017-01-11T02:51:23+5:30

चारित्र्याच्या संशयावरून नवऱ्याने बुटाच्या लेसने बायकोचा गळा आवळून खून केल्याची घटना (दि.९) सोमवारी दुपारी एकच्या सुमारास करंजगाव

The woman's blood on the character's suspicion | चारित्र्याच्या संशयावरून महिलेचा खून

चारित्र्याच्या संशयावरून महिलेचा खून

कामशेत : चारित्र्याच्या संशयावरून नवऱ्याने बुटाच्या लेसने बायकोचा गळा आवळून खून केल्याची घटना (दि.९) सोमवारी दुपारी एकच्या सुमारास करंजगाव (ता. मावळ) हद्दीत घडली. भीमा काळुराम वाघमारे (वय ३०, रा. भिवपुरी टाटापॉवर स्टेशन, ता. कर्जत जि. रायगड) असे खुनातील मृत महिलेचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काळुराम सतीश वाघमारे (वय ३४, रा. भिवपुरी टाटापॉवर स्टेशन, ता. कर्जत, जि. रायगड) यांच्यासोबत २००४ मध्ये भीमा हिचा विवाह झाला होता. काळुराम हा त्याची बायको भीमा हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत होता. त्या त्रासाला कंटाळून भीमा ही करंजगाव (ता.मावळ) येथे माहेरी राहू लागली. तिचा नवरा काळुराम हा अधूनमधून भेटायला येत होता.
शनिवारी (दि.९) दुपारी शेळ्या चारण्यासाठी व कपडे धुण्यासाठी करंजगाव (ता. मावळ) हद्दीत भवऱ्या ओढ्याजवळ आली असता, तिचा नवरा काळुराम याने चारित्र्याच्या संशयावरून बुटाच्या लेसने भीमा ही गळा आवळून खून केला. घटनास्थळावरून आरोपी काळुराम फरार झाला.
कामशेत पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची फिर्याद लक्ष्मीबाई वाघमारे यांनी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रावसाहेव खेडेकर करत आहे. (वार्ताहर)

Web Title: The woman's blood on the character's suspicion