शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लोहगावमध्ये अनैतिक संबंधातून महिलेचा गळा आवळून खून; आरोपीला बिहारमधून घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 20:51 IST

घरात पूर्वी राहणाऱ्या भाडेकरू इसमाने त्यांचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले होते...

येरवडा: येरवडा - अनैतिक संबंधातून महिलेचा गळा आवळून खून करून पसार झालेल्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी बिहार येथे जाऊन शिताफीने सापळा रचून अटक केली. या खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी मोहम्मद गुलाब मोहम्मद मुक्तार शेख (वय 32, रा. मूळचा बिहार, सध्या राहणार पठारे वस्ती लोहगाव) याला अटक करण्यात आली आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 फेब्रुवारी रोजी मोझेआळी लोहगाव येथे एक महिला स्वतःच्या घरात बाथरूम मध्ये बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती विमानतळ पोलिसांना देण्यात आली होती. संशयास्पद रित्या महिलेचा मृत्यू झाल्यामुळे शव विच्छेदनानंतर सदर महिलेचा अज्ञात इसमाने गळा आवळून खून केल्याचा अहवाल विमानतळ पोलिसांना प्राप्त झाला होता. अधिक तपासात अनैतिक संबंधातून त्यांच्याच घरात पूर्वी राहणाऱ्या भाडेकरू इसमाने त्यांचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून  फरार आरोपी मोहम्मद मुख्तार शेख याचा शोध घेण्यासाठी तात्काळ विशेष पथक त्याच्या मूळ गावी बिहार येथे पाठविण्यात आले होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून बिहार येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. अधिक तपासात अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून त्यानेच सदर महिलेचा गळा आवळून खून केल्याचे कबूल केले. 

अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलिस उपायुक्त रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद पाठक, पोलीस उपनिरीक्षक एस.ए. जाधव, पोलीस अंमलदार रमेश लोहकरे, किरण खुडे, उमेश धेंडे,  विनोद महाजन,किरण अब्दागिरे, रिहान  पठान, नाना कर्चे, रुपेश तोडेकर यांच्या पथकाने या गुन्ह्याचा शिताफीने तपास केला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीLohgaonलोहगाव