शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला पुढे करून तळेगावात व्यापाऱ्याची ब्लॅकमेलद्वारे लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 00:28 IST

अपहरण : निर्जनस्थळी नेऊन टोळक्याकडून मारहाण

कामशेत : शहरातील एका प्रतिष्ठित युवा कापड व्यापाऱ्याला मागील काही दिवसांपासून एका अज्ञात महिलेचा फोन येत होता. यातून त्यांचे बोलणे अधिक वाढून महिलेने युवकास भेटण्यास तळेगावला बोलावले. या वेळी युवकाला जांभूळफाटा येथील लॉजवर नेले. त्यानंतर बाहेर आल्यावर चार ते पाच अज्ञात इसमांनी त्याचे अपहरण केले.

पवनानगर-पौड रोड भागात नेऊन इतर दोघा-तिघांनी मिळून त्याला मारहाण केली. तसेच २५ लाख रुपयांची मागणी केली. त्यातील काही पैसे आॅनलाइन बँकिंगच्या माध्यमातून अज्ञात खात्यावर ट्रान्सफर केले. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी राजेंद्रसिंह इंदरसिंह परमार (वय २५, रा. साईबाबा चौक, कामशेत) यास एका अज्ञात महिलेने फोन केला. तळेगाव एसटी स्थानकावर भेटण्यास बोलावले. तेथून ते लॉजवर गेले. त्या वेळी युवकास लॉजबाहेर थांबलेल्या पाच जणांनी मारहाण केली. त्याचे अपहरण केले.

पवनानगर-पौड रोडने अज्ञातस्थळी नेऊन एका पडक्या घरात कपडे काढून मारहाण केली. युवराज माने यानेही मारहाण केली. तू आम्हाला पंचवीस लाख रुपये दे अशी मागणी केली. त्याच्या खिशातील १५०० रुपये, महागडा मोबाइल जबरीने काढून घेतला. युवकाला धमकावत त्याच्या मोबाईलमधील आॅनलाइन बँकिंग अ‍ॅपच्या माध्यमातून सुमारे ९६००० रुपये महिलेच्या खात्यावर ट्रान्सफर केले व २५ लाखातील उर्वरित रक्कम येत्या महिन्याच्या ६ तारखेपर्यंत देण्यासाठी मोबाइलवर व्हिडीओ बनविण्यात आला. पैसे न दिल्यास तुला व तुझ्या घरच्यांना जिवे मारू, अशी धमकी दिली.अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; महिलेकडून उकळले १५ लाख1पिंपरी : अश्लील व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडून १५ लाख रुपये उकळले. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश भारत पैलवान (रा. वडगाव शेरी, पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी महिला व आरोपी हे मुंबई येथे एकत्र कामाला होते.2दरम्यान, आरोपीने फिर्यादी महिलेशी जवळीक निर्माण करून महिलेला मिल्क पावडरचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर शीतपेयातून गुंगीकारक पदार्थ देऊन शारीरिक संबंध ठेवले. तसेच या घटनेचा व्हीडिओ तयार करण्यासह फोटो काढले. त्यानंतर हा व्हीडिओ व फोटो फिर्यादीस दाखवत ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादीकडून वेळोवेळी १५ लाख ५० हजार रुपये खंडणी घेतली. त्यानंतरही महिलेला वारंवार लॉजमध्ये नेऊन दारू पाजून फिर्यादीशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच त्याची क्लिप फिर्यादी यांचे नातेवाईक व मित्र परिवारास व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवून फिर्यादीची बदनामी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे