टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत महिला मृत्युमुखी : नात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:16 IST2021-09-16T04:16:34+5:302021-09-16T04:16:34+5:30

पुणे : भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातात त्यांची नात ...

Woman killed, granddaughter injured in Tempo Traveler crash | टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत महिला मृत्युमुखी : नात जखमी

टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत महिला मृत्युमुखी : नात जखमी

पुणे : भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातात त्यांची नात जखमी झाली आहे. हा अपघात वारजे पुलावर १३ सप्टेंबर रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडला. मीना राजेंद्र वाघमारे (वय ४५, रा. केळेवाडी, कोथरूड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सई वाघमारे असे जखमी झालेल्या नातीचे नाव आहे. याप्रकरणी राजेंद्र वाघमारे यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र आणि त्यांची पत्नी मीना व नात सई १३ सप्टेंबरला दुचाकीवरून घराकडे चालले होते. त्या वेळी वारजे पुलावर भरधाव ट्रेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिल्याने तिघेही खाली पडले. त्यामुळे मीना आणि सई जखमी झाले होते. उपचारादरम्यान मीना यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पारवे तपास करीत आहेत.

Web Title: Woman killed, granddaughter injured in Tempo Traveler crash