मोटारीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:15 IST2021-09-12T04:15:27+5:302021-09-12T04:15:27+5:30

पुणे : कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर भरधाव मोटारीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाला. फातिमा मुफद्दल खेडवाला ...

Woman killed in car crash | मोटारीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

मोटारीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

पुणे : कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर भरधाव मोटारीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाला.

फातिमा मुफद्दल खेडवाला (वय ३०, रा. फकरी हिल्स, कोंढवा) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात फातिमा यांचे पती मुफद्दल जखमी झाले आहेत.

याप्रकरणी पोलीस हवालदार देवानंद धोत्रे यांनी फिर्याद दिली आहे. कोंढवा पोलिसांनी अज्ञात मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दुचाकीस्वार मुफद्दल आणि त्यांची पत्नी फातिमा एनआयबीएम रस्त्याने उंड्रीकडे निघाले होते. सांगारिया मार्वेल सोसायटीसमोर भरधाव मोटारीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी फातिमा आणि त्यांचे पती मुफद्दल जखमी झाले. फातिमा यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Woman killed in car crash